AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आफ्रिकन शेळीने नेवाशातील शेतकऱ्याचं नशीब पालटलं, एका शेळीला बुलेटची किंमत!

आफ्रिकन शेळीने नेवास्यातील एका शेतकऱ्याचं नशीब पालटलं आहे. एका बुलेट गाडीची जितकी किंमत असते अगदी तितक्या किंमतीने ही शेळी विकली गेली आहे (African goat sold in one and half lakh rupees).

आफ्रिकन शेळीने नेवाशातील शेतकऱ्याचं नशीब पालटलं, एका शेळीला बुलेटची किंमत!
| Edited By: | Updated on: Feb 10, 2021 | 11:46 AM
Share

अहमदनगर : आफ्रिकन शेळीने नेवास्यातील एका शेतकऱ्याचं नशीब पालटलं आहे. अहमदनगरला नेवासा तालुक्यातील भेंडा येथे आफ्रिकन शेळीची किंमत 1 लाख 51 हजार रूपये आली आहे. विशेष म्हणजे एका बुलेट गाडीची जितकी किंमत असते अगदी तितक्या किंमतीने ही शेळी विकली गेली आहे. त्यामुळे शेतकरी देखील आनंदी झाला आहे. भेंडा येथील शेतकरी संदीप परसराम मिसाळ यांच्या मालकीची ती शेळी होती. मिळास यांचे समृद्धी बोअर गोट फॉर्म आहे. तर अनेक दिवसांपासून ते शेळी पालनाचा व्यवसाय करताय. त्यांच्या आफ्रिकन जातीच्या एका शेळीचे वजन दरोरोज 300 ते 350 ग्रॅमने वाढते. त्यामुळे या शेळीला बाजारात मोठी मागणी असल्याचं मिळास यांनी म्हटलंय.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील शेतकरी संदीप परसराम मिसाळ यांच्या समृद्धी बोअर गोट फॉर्म मधील आफ्रिकन शेळी त्यांनी 1 लाख 51 हजार रुपयांना तेजस भोईटे (राहणार- फलटण, मल्हारी बोअर गोट फॉर्म ) यांना विकली आहे. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

ही आफ्रिकन शेळी 1 लाख 51 हजार रुपयांना विकल्यामुळे समृद्धी बोअर गोट फॉर्मचे मालक संदीप मिसाळ यांनी फेटा बांधून आणि फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. यावेळी उद्योजक बापूदादा नजन, श्रीधर मिसाळ, बाळू मिसाळ, डॉ. ढवाण, राजू तागड, खंडू मिसाळ तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सध्या संदिप मिसाळ यांच्याकडे 15 आफ्रिकन जातीच्या फिमेल शेळ्या आहेत. ते प्रत्येक वर्षाकाठी सुमारे 15 ते 16 लाख रुपये कमावतात. त्यांनी 2016 पासून हा समृद्धी बोअर गोट फॉर्म चालू केला आहे.

आफ्रिकन शेळीचे वैशिष्ट्ये :

या शेळीचे वजन दिवसाला 300 ते 350 ग्रॅमने वाढते. ही शेळी तिसऱ्या वेताला असून साऊथ आफ्रिकामधून आयात केलेल्या मेलपासून मेटीन केली आहे. या फिमेलची होणारी पैदास पिवरलाईनमध्ये स्टड होते. या शेळींच्या पिल्लांची वजनवाढ दिवसाला 400 ते 450 ग्रॅम वाढते.

आफ्रिकन शेळीचे खाद्य :

शेळीला दिवसाला 1 किलो खाद्य लागते. यामुळे दररोज 30 ते 35 रूपये खर्च येतो. तर एका वेताला 2 लाख रुपये उत्पन्न मिळते, असे शेतकरी संदीप मिसाळ यांनी सांगितले.

हेही वाचा :

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.