AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुझ्यात दोष, त्यासाठी….फकीर बाबाच्या कांडने राज्यात खळबळ, महिलांना बेशुद्ध करून…हादरवणारी घटना समोर!

राज्यात अशोक खरातचे प्रकरण ताजे आहे. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडालेली आहे. असे असतानाच आता राज्याला हादरवून टाकणारे नवे प्रकरण समोर आले आहे.

तुझ्यात दोष, त्यासाठी....फकीर बाबाच्या कांडने राज्यात खळबळ, महिलांना बेशुद्ध करून...हादरवणारी घटना समोर!
kandivali fakir babaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 20, 2026 | 3:40 PM
Share

Kandivali Fakir Baba : नाशिकच्या भोंदू अशोक खरातने तंत्र-मंत्र आणि जादूच्या नावाखाली अनेक महिलांवर अत्याचार केले. त्याच्या या लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी राज्य हादरले आहे. त्याने आपल्या या कृत्यांमधून हजारो कोटींची माया जमवली आहे. विशेष म्हणजे खरातचे प्रकरण समोर येताच अनेक राजकीय नेते त्याच्या संपर्कात असल्याचा आरोप होतोय. दरम्यान, खरातच्या अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक महिलांचा गैरफायदा घेतल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता एका भोंदू फकीरबाबाने दोन तरुणी आणि एका महिलेसोबत भयंकर प्रकार केला आहे. समोर आलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मुंबईतील कांदिवली परिसरात घडली. पोलिसांनी या भोंदू फकिराला अटक केले आहे. त्याने समस्या सोडवण्याच्या नवाखाली एका तरुणीचा विनयभंग केला आहे. हा फकीर बाबा महिलांना त्यांच्या समस्या सांगून उपचाराच्या नावाखाली आधी बेशुद्ध करायचा आणि नंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा असा आरोप आहे.

या भोंदू फकीर बाबाचे नाव इरफान नियाज अहमद असे आहे. त्याचे वय 34 वर्षे आहे. तो मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील बहराइच येथील रहिवासी आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहत असून स्वतःला तो फकीर बाबा असल्याचे सांगतो.

त्याचे कांड समोर कसे आले?

या फकीराने कांदिवलीत राहणाऱ्या एका स्त्रीला स्वतःची बाबा म्हणून ओळख करून दिली. तसेच तुझे पती आता या जगात नाहीत. तुझ्यावर दोष आहे. हा दोष दूर करण्यासाठी तुला एक पद्धत अवलंबावी लागेल, असे त्या महिलेला सांगितले. त्यानंतर त्यानंतर बाबाने ती संंबंधित स्त्री आणि तिच्या दोन मुलींसोबत विधी करायला सुरुवात केली. या विधीदरम्यान स्त्री आणि तिच्या दोन मुली बेशुद्ध पडल्या. त्यानंतर फकिराने एका मुलीचा विनयभंग केला, असा आरोप आहे.

फकीरबाबा पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर कांदिवली पोलिसांनी फकीरविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 78, 123, 3 (2) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. त्याला पोलिसांनी 13 तारखेला अटक केली आहे. सध्या बाबांना पोलीस कोठडी मिळाली आहे. फकीर बाबा तरुंगात आहे. लवकरच पोलीस त्याला चौकशीसाठी ताब्यात घेणार आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...