
एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या कार्यपद्धतीच कौतुक केलं. त्यावर आज संजय राऊत बोलले. “मुख्यमंत्र्यांनी या राज्याचे, देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यातल्या अथक परिश्रम आणि सातत्य याचं कौतुक केलय. त्याच्याबद्दल कोणाला आश्चर्य वाटण्याच कारण नाही. तुम्ही राजकीय टीका कितीही केली, तरी हे एकानेत्यामध्ये जे गुण आहेत, ते तुम्हाला, महाराष्ट्राला, देशाला मान्य करावेच लागतील. नुसतं कौतुक करुन चालणार नाही. परिश्रम, सातत्य आणि संयम या गुणाची कास देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा घ्यावी” असं संजय राऊत म्हणाले.
“पराभवात किंवा निवडणुकीच यश-अपयश अनेक नेत्यांना थांबवत नाही. बाळासाहेब ठाकरे होते, आता शरद पवार सगळ्यांचे आदर्श आहेत. इतक्यावर्षांनी देवेंद्र फडणवीस यांना पवारांचे हे गुण दिसले यासाठी त्यांचे आभार मानले पाहिजेत” असं संजय राऊत म्हणाले. “ज्याअर्थी देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच इतकं कौतुक केलं, त्याअर्थी त्यांनी दिल्लीची परवानगी घेतली असेल. आम्हाला पवारांविषयी आदर व्यक्त करण्याला कोणाची परवानगी लागत नाही. भाजपचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात. देवेंद्र फडणवीसांनी परवा छगन भुजबळांच कौतुक केलं. त्यांच्या कौतुकाला फार महत्त्व देऊ नका. उद्या ते नवाब मलिकांच कौतुक करतील. भाजपचा भरवसा नाही. ते कधी कोणावर हल्ला करतील, कोणाचं कौतुक करतील हे त्यांनाच माहित” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
शरद पवार भाजपसोबत जातील का?
शरद पवार गटात दोन मतप्रवाह आहेत, एक मोठा गट भाजपासोबत जाण्यासाठी व्याकुळ आहे. पण शरद पवारांनी अजून स्टँड घेतलेला नाही, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, “हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मला ज्ञान आहे, त्यानुसार शरद पवार भाजपासोबत जाणार नाहीत. पवारसाहेबांनी राजकारणात खूप मोठी इनिंग खेळलेली आहे, खेळतायत. आता ते कोचिंगच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे मी त्यांना ओळखतो. त्यांची विचारधारा भूमिका मला माहित आहे. अशा नेत्यांना वयाची बंधन नसतता. शरद पवारांची विचारधार भूमिका पाहिल्यावर ते भाजपसोबत कधी जाणार नाहीत हा माझा विश्वास आहे”
‘तहान लागल्यानंतर कोणी गटारातल गढूळ पाणी पित नाही’
शरद पवारांची नवीन पिढी भाजपासोबत जाण्यासाठी व्याकुळ आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “मला वाटत नाही तसं, सुप्रिया सुळेंच नाव तुम्ही वारंवार घेताय. अन्य काही नेत्यांच नाव घेताय. त्यांना तहान नक्कीच लागली आहे. पण तहान लागल्यानंतर कोणी गटारातल गढूळ पाणी पित नाही. सत्तेची तहान लागली असेल, कारण कारखाने, सूत गिरण्या आहेत. तहान लागली असली, तरी कोणत्या डबक्यात उडी मारायची. प्रत्येकाला आपलं स्थान शोधाव लागेल. जे गेलेत ते धडपडतायत, नवीन जाऊन काय करणार” असं संजय राऊत म्हणाले.