AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP | ‘भाजपच्या चौकटीत राहूनच काम करा’, कोल्हापुरातील मोठ्या भाजपा नेत्याचा मुश्रीफांना इशारा

BJP | 'संघर्ष जितना बडा होगा, जीत उतनी शानदार होगी', असं कोल्हापुरातील या भाजपा नेत्याने म्हटलं आहे. हसन मुश्रीफ यांची कोल्हापुरच्या पालकमंत्री पदावर निवड होताच, भाजपा नेत्याने हे वक्तव्य केलय.

BJP | 'भाजपच्या चौकटीत राहूनच काम करा', कोल्हापुरातील मोठ्या भाजपा नेत्याचा मुश्रीफांना इशारा
Hasan Mushrif
| Updated on: Oct 05, 2023 | 2:00 PM
Share

कोल्हापूर (भूषण पाटील) : बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या राज्यातील पालक मंत्र्यांच्या नावाची अखेर काल घोषणा करण्यात आली. पालक मंत्रीपदावरुन महायुतीच्या सरकारमध्ये रस्सीखेच होतीच. त्यामुळे नाव जाहीर झाल्यानंतर थोडी धुसफूस होणं अपेक्षित होतच. खासकरुन पुण्याच्या पालक मंत्रीपदाची विशेष चर्चा झाली. चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री आहेत. आता त्यांच्याजागी अजित पवार यांची पुण्याच्या पालक मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे या बदलाची विशेष चर्चा आहे. दोन्ही नेत्यांकडून पुण्यात बैठका घेतल्या जायच्या. त्याची चर्चा व्हायची. आता अजित पवार पुण्याच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतील. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर, अमरावती या दोन जिल्ह्यांच्या पालक मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलीय.

दरम्यान महायुतीच्या सरकारमध्ये कोल्हापूरच्या पालक मंत्रीपदावरुन सुद्धा धुसफूस असल्याच स्पष्ट झालं आहे. हसन मुश्रीफ यांची कोल्हापूरच्या पालक मंत्री पदावर निवड होताच समर्जित घाडगे यांनी मुश्रीफ यांना थेट इशारा दिला आहे. “भाजपच्या मेहरबानीमुळे हसन मुश्रीफ याना पालकमंत्रीपद मिळाले हे त्यांनी विसरू नये. भाजपच्या चौकटीत राहूनच त्यांना काम करावे लागेल” असं समर्जित घाडगे म्हणाले. जिल्ह्याच्या राजकारणात समर्जित घाडगे हे हसन मुश्रीफ यांचे मोठे विरोधक मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून समर्जित घाडगे यांनी आपली अस्वस्थतचा जाहीरपणे व्यक्त केली आहे. ‘जीत उतनी शानदार होगी’

“हसन मुश्रीफ ज्या ज्या ठिकाणी चौकट ओलांडतील, त्या त्या वेळी मी त्यांच्या समोर उभा राहीन. हसन मुश्रीफ मुख्यमंत्री झाले, तरी मला फरक पडत नाही. पालकमंत्री तर सोडाच, त्यांच्याशी माझा संघर्ष कायम अटळ आहे. संघर्ष जितना बडा होगा, जीत उतनी शानदार होगी” असं समर्जित घाडगे म्हणाले.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान