Maharashatra Marathi News Live | कपिल शर्मा याला इडीचं समन्स, नक्की कारण काय?

| Updated on: Oct 06, 2023 | 7:19 AM

Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashatra Marathi News Live | कपिल शर्मा याला इडीचं समन्स, नक्की कारण काय?

मुंबई | 5 ऑक्टोबर 2023 : धाराशीव येथील उपळा येथे मनोज जरांगे पाटील यांचं पहाटे 3 वाजता भव्य स्वागत. फटाके फोडून आणि पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत. उत्तराखंडच्या उत्तरकाशीत 3.2 तीव्रतेचा भूकंप. कोणतीही जीवित वा वित्तहानी नाही. सिक्कीमध्ये पुरात वाहून गेलेले 22 जवान अजूनही बेपत्ता. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हसोरी गावात भूकंपाचे धक्के. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 1.6 एवढी नोंदवली गेली. यासह राज्य आणि देशविदेशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Oct 2023 09:00 PM (IST)

    Kapil Sharma Ed Summons | कॉमेडियन कपिल शर्मा याला महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी हे समन्स

    मुंबई | मोठी बातमी समोर आली आहे. कॉमेडियन कपिल शर्मा याला इडीने समन्स बजावलं आहे. महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे. हुमा कुरेशी आणि हिना खानसह अन्य दोघांनाही समन्स बजावलं आहे.

  • 05 Oct 2023 08:10 PM (IST)

    Pune Metro | पुणे मेट्रोकडून ‘एक पुणे विद्यार्थी पास’ कार्डची विद्यार्थ्यांना भेट

    पुणे | पुणे मेट्रोने 12 ऑगस्ट रोजी ‘एक पुणे कार्ड’ या मेट्रोच्या बहुउद्देशीय कार्डचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते केले होते. त्यानंतर आता पुणे मेट्रो आता विद्यार्थ्यांसाठी ‘एक पुणे विद्यार्थी पास’ या मेट्रो कार्डचे लोकार्पण करणार आहे. एक पुणे विद्यार्थी पास कार्ड घेण्यासाठी १३ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. १३ ते १८ वर्षे वय असणारे विद्यार्थी पॅन कार्ड नसल्यास एक ई-फॉर्म भरून आपले “एक पुणे विद्यर्थी पास” कार्ड प्राप्त करू शकतात.

  • 05 Oct 2023 07:56 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांनी केला सरकारवर हल्लाबोल

    मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर मोठा हल्लाबोल केलाय. मनोज जरांगे पाटील यांनी थेट म्हटले की, निर्दयी सरकारने आंदोलन करत असताना आमच्यावर हल्ला केला. आंदोलन मोडीच काढण्यासाठीच सरकारने हल्ला केला.

  • 05 Oct 2023 07:48 PM (IST)

    Pune News : आंदेकर टोळीकडून करण्यात आला तरुणाचा खून

    पुण्यात पुर्ववैमन्यासातून आंदेकर टोळीकडून तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये. बंडू आंदेकरसह 6  जणांना अटक करण्यात आलीये. यापैकी तीन जण हे अल्पवयीन असून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय.

  • 05 Oct 2023 07:32 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतावेळी घडली मोठी घटना

    सोलापूर शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सापडला चोर सापडला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व मराठा बांधव स्वागतासाठी असताना गर्दीचा फायदा घेत चोरी करताना उपस्थितांनी त्याला चोप दिल्याची घटना घडलीये.

  • 05 Oct 2023 07:23 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांची मंगळवेढ्यात जाहीर सभा

    मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज मंगळवेढ्यात जाहीर सभा होणार आहे.  मंगळवेढा येथील संत दामाजी चौकामध्ये जरांगे पाटील यांचे जेसीबीमधून झेंडु आणि गुलाबांच्या फुलांची उधळण करत स्वागत करण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटील हे सभेच्या ठिकाणी पोहचले आहेत.

  • 05 Oct 2023 07:09 PM (IST)

    जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटवर अण्णा हजारे यांनी दिले प्रत्युत्तर

    आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटवर अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिलंय. वकिलाचा सल्ला घेऊन अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

  • 05 Oct 2023 06:55 PM (IST)

    ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी न्यायालयाकडून चार आठवड्यांची मुदतवाढ

    वाराणसी न्यायालयाने एएसआयला ज्ञानवापी मशीद परिसराचे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी आणखी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. एएसआयच्या पथकाने न्यायालयाला मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती.

  • 05 Oct 2023 06:45 PM (IST)

    संजय सिंह यांच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

    दिल्ली: आपचे खासदार संजय सिंह यांचे वडील दिनेश सिंह म्हणाले, "आता निर्णय राखून ठेवला आहे, निकाल आता येईल. माझा अंदाज आहे की रिमांड 1 आठवड्याचा असेल.

  • 05 Oct 2023 06:30 PM (IST)

    माझ्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न : नार्वेकर

    माझ्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला आहे. मी कायद्याने निर्णय घेणार आहे. दुसरीकडे, संजय राऊत यांनी यांनी नार्वेकर यांच्यावर टीका केली. त्यांनी घटनेवर बोलणं म्हणजे घटनेचा अपमान असल्याचा आरोप केला आहे.

  • 05 Oct 2023 06:22 PM (IST)

    लंडन दौरा मी स्वखर्चाने केला, उदय सामंत यांचं आदित्य ठाकरेंना उत्तर

    लंडन दौरा मी स्वखर्चाने केला, असं उत्तर मंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांना दिलं आहे. माझ्या वडिलांच्या नावाचा चेक पाच लाख आणि काहीतरी रक्कम आहे. तो संबंधित एजन्सीला दिला गेला होता. मला लंडनला जायचं होतं आणि मी गेलो.

  • 05 Oct 2023 06:15 PM (IST)

    टीम इंडियाच्या फुटबॉल संघाचे व्यवस्थापक इगोर यांना मुदतवाढ

    भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे व्यवस्थापक इगोर स्टिमॅक यांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे.

  • 05 Oct 2023 06:04 PM (IST)

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा केंद्र सरकारवर निशाणा

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, "हे लोक सर्व खोट्या केसेस दाखल करत आहेत. त्यांनी इतके गुन्हे दाखल केले, खूप तपास केला पण काहीही निष्पन्न होत नाही. या तपासाच्या खेळात प्रत्येकाचा वेळ वाया जात आहे."

  • 05 Oct 2023 05:49 PM (IST)

    Nashik Crime | नोकरीचं आमिष देवून तरुणीला 7 लाखांचा गंडा, आरोपीला 5 महिन्यांनी अटक

    नाशिक | इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये नोकरीला लावून देतो, असे सांगून एका युवतीला 7 लाखांचा गंडा घालण्यात आलाय. युवतीच्या तक्रारीनुसार इंदिरा नगर पोलीस ठाण्यात संशयिता विरोधात 5 महिन्यापूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल पाच महिन्यानंतर या संस्थेला पकडण्यात इंदिरानगर पोलिसांना यश आलंय. संशयित विजयकुमार मुंडावरे हा पोलिसांना पाच महिन्यांपासून चकवा देत होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केलीय.

  • 05 Oct 2023 05:39 PM (IST)

    Maharashtra Congress | प्रदेश काँग्रेसच्या कोकण विभागाची आढावा बैठक मुंबईत होणार

    मुंबई | अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कार्यकारिणीच्या हैदराबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीतील निर्देशानुसार प्रदेश काँग्रेसच्या विभागीय बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. कोकण विभागाची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ७ ऑक्टोबरला नवी मुंबईतील रबाळे येथे होत आहे. या बैठकीला माजी मंत्री, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी खासदार हुसेन दलवाई, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे उपस्थित राहणार आहेत तर या बैठकीचे समन्वयक प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा आहेत.

  • 05 Oct 2023 05:34 PM (IST)

    Avinash Jadhav | मनसेच्या अविनाश जाधव यांचं ठाण्यात उपोषण, प्रशासनाशी चर्चा निष्फळ

    ठाणे | मनसेच्या वतीने ठाण्यातील आनंद नगर चेक नाका येथे आमरण उपोषण सुरू आहे. हे उपोषण मागे घेण्यासाठी सकाळी पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांना विनंती केली होती. मोठा पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. मात्र दुपारनंतर पोलिसांनी थोडी नरमायीची भूमिका घेतल्याचं दिसून आलं. पोलिसांच्या मध्यस्थी नंतर MSRDC चे अधिकारी दुपारी 4 च्या सुमारास उपोषण स्थळी आले.  त्यांनी जाधव यांच्याशी चर्चा केली. उपोषण मागे घेण्यात यावं, अशी त्यांनी विनंती केली. मात्र जोपर्यंत टोल दरवाढीबाबत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचा पवित्रा जाधव यांनी घेतलाय. त्यामुळे याबाबतीत वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे सध्या तरी मनसेने उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

  • 05 Oct 2023 04:59 PM (IST)

    Supriya Sule : कसा होईल विश्वगुरु? सुप्रिया सुळे यांचा सवाल

    आरोग्य सुविधांचा विकास करण्यासाठी देशाच्या 'जीडीपी'चा किमान ६ ते ८ टक्के हिस्सा त्यांच्यावर खर्च करण्याची गरज आहे. जगातील सर्व विकसित राष्ट्रे हे गेली काही दशकांपासून करीत आहेत. आरोग्य क्षेत्रावर जीडीपीचा केवळ ३ टक्के खर्च करुन भारत 'विश्वगुरु' होऊ शकणार नाही.आरोग्यक्षेत्राची हेळसांड करुन भारत विकसित राष्ट्र होऊ शकणार नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

  • 05 Oct 2023 04:50 PM (IST)

    India Alliance : वंचितला अद्याप निमंत्रण नाही

    इंडिया आघाडीत देशातील अनेक पक्ष सहभागी झाले आहेत. यापूर्वी पण वंचित आघाडीला इंडिया अलायन्समध्ये सहभागी करुन घेण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच उद्धव ठाकरे गटासोबत वंचित असल्याने त्यांचा मार्ग सुखर होईल असे वाटत होते. पण अद्याप इंडिया आघाडीत सहभागासाठी निमंत्रण मिळाले नसल्याचे वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.

  • 05 Oct 2023 04:19 PM (IST)

    PM Narendra Modi : मुंबई मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यांच्या हस्ते मुंबई मेट्रोचे लोकार्पण होईल. नवी मुंबई मेट्रोचा 11 किलोमीटरचा मार्ग पूर्ण झाला आहे. अनेक दिवसांपासून या मेट्रोचं लोकार्पण प्रतिक्षेत आहे. त्यामुळे मोदी यांच्या दौऱ्याची चर्चा आहे.

  • 05 Oct 2023 04:06 PM (IST)

    Devendra Fadnavis News : अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार

    अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची संधी कधी ना कधी मिळणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करु असे पण त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार कधीही मुख्यमंत्री होऊ शकतात, असे धर्मरावबाबा आत्राम यांनी वक्तव्य केले होते. त्यानंतर राजकीय गोटात याविषयीच्या चर्चा रंगल्या आहेत.

  • 05 Oct 2023 03:45 PM (IST)

    नाशिक- दादा भुसेंनी केली जिल्हा शासकीय रुग्णालयाची पाहणी

    नाशिक- दादा भुसेंनी जिल्हा शासकीय रुग्णालयाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी औषधांचा साठा आणि इतर व्यवस्थेचा आढावा घेतला. नांदेड घटनेच्या पार्शवभूमीवर पालकमंत्री यांनी ही पाहणी केली. केंद्रीय मंत्री भारती पवार यांनीदेखील आजच औषधसाठ्याचा आढावा घेतला.

  • 05 Oct 2023 03:32 PM (IST)

    चिन्ह गेलं तरी फरक पडणार नाही- शरद पवार

    चिन्ह गेलं तरी फरक पडणार नाही. आतापर्यंत खूप वेळा चिन्ह बदललं आहे. पण देशातील माहोल बदलत आहे. त्यामुळे लवकरच परिवर्तन होईल, अशा शब्दांत शरद पवार यांनी हल्लाबोल केला आहे.

  • 05 Oct 2023 03:30 PM (IST)

    सासवड इथं दलित आणि मुस्लिम संघटनांकडून जन आक्रोश मोर्चानंतर रस्त्यावर ठिय्या

    पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड इथं दलित संघटना आणि मुस्लिम संघटना यांच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात 'जन आक्रोश' मोर्चानंतर आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. त्यामुळे पुणे -पंढरपूर मार्गावर काही वेळाकरिता वाहतूक कोंडी निर्माण झाली. आंदोलकांनी काही काळ रस्ता रोखून धरला होता. पुरंदरचे नायब तहसीलदार गवारी यांना निवेदन देऊन आंदोलकांनी रास्ता रोको मागे घेतला.

  • 05 Oct 2023 03:19 PM (IST)

    ईडी आणि सीबीआयचा राजकीय वापर- शरद पवार

    काही दिवसांपूर्वी ईडीचं नावच माहीत नव्हतं. पण आजकला भांडण झालं तर ईडी लावेन म्हणतात. दिल्लीतील राज्यसभा खासदाराच्या घरावर छापा टाकला. आज सकाळी कोणीतरी सांगितलं की इतर राज्यातही हेच सुरु आहे. अनिल देशमुख यांना अटक करून 13 महिने ठेवसं. त्यात काही न आढळल्याने सुप्रीम कोर्टाने सोडून दिलं. संजय राऊत यांना अटक केली. त्यांनाही सुप्रीम कोर्टाने सोडलं. मोदींच्या विरोधात लिहितात म्हणून ही कारवाई केली. ईडी आणि सीबीआयचा राजकीय वापर केला जातोय.

  • 05 Oct 2023 03:15 PM (IST)

    वाघनखं भारतात आणण्याच्या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर उदय सामंत मुंबईत

    वाघनखं भारतात आणण्याच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत मुंबईत दाखल होत आहेत. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुणेरी ढोल-ताषाचं वादन एअरपोर्टवर सुरू झालं आहे. हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित झाले आहेत.

  • 05 Oct 2023 03:15 PM (IST)

    भाजप आहे कुठे? शरद पवार यांचा हल्लाबोल

    नवी दिल्ली :  केरळात भाजप नाही. तामिळनाडू मध्ये नाही. गोव्यात नव्हती मात्र निवडून आलेलं आमदार तोडून सत्ता आणली. आंध्र प्रदेशात भाजप नाही. महाराष्ट्रात भाजप नव्हती. मध्यप्रदेश मध्ये नव्हती मात्र लोक तोडले मग सरकार आणले. राजस्थान मध्ये नाही. दिल्लीत नाही. पश्चिम बंगाल नाही, मग भाजप आहे कुठे? छोट्या छोट्या राज्यात भाजप आहे. देशात मूड बदलत आहे. आपण सगळ्यांनी एकत्रित काम केलं पाहिजे. देश बदलामध्ये सहभागी होतील

  • 05 Oct 2023 03:11 PM (IST)

    निवडणूक चिन्ह हा महत्त्वाचा आधार - शरद पवार

    नवी दिल्ली :  लोक सोडून गेलेत त्यानं काय आधार आहे? पण चिंता करण्याची गरज नाही. यापूर्वी कॉंग्रेसचे चिन्ह बदलले होते. कांग्रेसचे दोन भाग झाले होते. कांग्रेस आय आणि कांग्रेस ओ. निवडणूक चिन्ह हा महत्त्वाचा आधार आहे. चिन्ह गेलं तरी लोक बदलत नाहीत. पहिली निवडणूक मी उमेदवार होतो. चिन्ह होत बैलजोडी. त्यावर मी लढलो आणि निवडून आलो असे शरद पवार यांनी सांगितले

  • 05 Oct 2023 03:07 PM (IST)

    देशातील वातावरण बदलत आहे- शरद पवार

    आयोगाचा निर्णय आपल्याच बाजूने लागेल. निकाल काही असो, चिंतेचं कारण नाही. देशातील वातावरण बदलत आहे. अनेक राज्यात भाजपचे सरकार नाही. दिल्ली, पंजाब, ओडीसामध्ये भाजपची सत्ता नाही. माझी निवड योग्य नाही म्हणता, पण माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीवर तुमच्या सह्या आहेत, असं शरद पवार म्हणाले.

  • 05 Oct 2023 03:04 PM (IST)

    राष्ट्रवादी चिन्ह वापरण्याचा अधिकार फक्त आम्हाला- शरद पवार

    पक्षचिन्ह बाबत उद्या निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या गटाला ठणकावलं आहे. राष्ट्रवादी चिन्ह वापरण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे, असं ते म्हणाले.

  • 05 Oct 2023 03:00 PM (IST)

    मुंबई महापालिकेत पेन्शन अदालतीचे आयोजन

    मुंबई महापालिकेत पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आलं आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. पालिकेतील सर्व विभागाचे संबंधित अधिकारी बैठकीला हजर आहेत. प्रलंबित पेन्शनमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. रखडलेल्या पेन्शन प्रश्नावरून लोढांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

  • 05 Oct 2023 02:51 PM (IST)

    दिल्ली : राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतील मोठी बातमी

    दिल्ली : राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतील मोठी बातमी समोर आली आहे. देशातील 24 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बैठकीला उपस्थित आहेत. सर्व प्रदेशाध्यक्षांकडून शरद पवार यांचं नेतृत्व मान्य असल्याचं प्रतिज्ञापत्र भरुन घेण्यात येणार आहे. हे सर्व प्रतिज्ञापत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगात उद्या होणाऱ्या सुनावणीसाठी पक्षाची पूर्वतयारी सुरू आहे. पक्षाचं संघटन आणि प्रमुख पदाधिकारी शरद पवार गटाच्या बाजूने आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

  • 05 Oct 2023 01:32 PM (IST)

    बिहारप्रमाणे राज्यातही जातगणनेस फडणवीस अनुकूल - आशिष देशमुख

    बिहारच्या धर्तीवर राज्यातही जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूलता दर्शविल्याचे ओबीसी नेते माजी आमदार आशिष देशमुख यांनी म्हटले आहे.

  • 05 Oct 2023 01:17 PM (IST)

    नांदेड रुग्णालयातील घटनेवर बोलायला सरकार तयार नाही - आदित्य ठाकरे

    नांदेड रुग्णालयातील मृत्यूंबद्दल बोलायला कोणी तयार नसून राज्य सरकारने या प्रश्नावर मौन बाळगल्याची टीका शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

  • 05 Oct 2023 12:57 PM (IST)

    जितेंद्र आव्हाड यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

    राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.  शरद पवारांनी राष्ट्रपती राजवट लावली हे तुम्ही आता दोन वर्षांनी का सांगता? तुमच्यावर कोण विश्वास ठेवेल? उद्या केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होत आहे पाहू काय होतंय ते, असं आव्हाड म्हणालेत.

  • 05 Oct 2023 12:45 PM (IST)

    मनोज जरांगे यांच्या विरोधात मनोज घोडके आक्रमक

    मनोज जरांगे हे सातत्याने छगन भुजबळ यांच्या विषयी एकेरी भाषेत बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी छगन भुजबळ प्रणित समता परिषदेचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी केली आहे. मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगर इथल्या सभेत जर छगन भुजबळ यांच्याविषयी आक्षेपहार्य विधान केलं किंवा एकेरी भाषेत बोलले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची भूमिका मनोज घोडके यांनी घेतली आहे. मराठा समाज हा स्वतःला मोठा भाऊ म्हणून ओबीसी समाजाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप मनोज घोडके यांनी केला आहे.

  • 05 Oct 2023 12:30 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीला सुरुवात

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीला सुरुवात झाली आहे.  राजधानी दिल्लीत ही बैठक होत आहे. सगळे राष्ट्रीय सरचिटणीस, राज्याचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहेत. शरद पवार स्वत्तः सर्व बाबींचा आढावा घेणार आहेत.  आजच्या बैठकीत काय ठराव होतो हे पाहणं महत्वाचं असेल.

  • 05 Oct 2023 12:15 PM (IST)

    पुण्यात आपचं आंदोलन, काय कारण?

    खासदार संजय सिंग यांच्या अटकेच्या विरोधात पुण्यात आपचं आंदोलन सुरु आहे. पुण्यातील सीबीआय कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करत आप ने केला रास्ता रोको करण्यात येत आहे.  आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  केंद्रीय यंत्रणा जाणून बुजून कारवाई करत असल्याचा आपचा आरोप आहे. केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत. संजय सिंग यांना टार्गेट करुन अटक केल्याचा आरोप आपचचा आहे. आपच्या  कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

  • 05 Oct 2023 11:43 AM (IST)

    Maharashtra News : पालकमंत्रापदानंतर लवकरच विधीमंडळ समित्यांचंही वाटप होणार- सूत्र

    पालकमंत्रापदानंतर लवकरच विधीमंडळ समित्यांचंही वाटप होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. महायुतीतील पक्षांच्या आमदारांच्या संख्येवरून समित्यांमध्ये वाटा मिळणार असल्याची माहिती आहे. येत्या आठवडाभरात या समित्यांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 05 Oct 2023 11:37 AM (IST)

    Manoj Jarange : सोलापूरात आज मनोज जरांगे यांची सभा

    सोलापूरात आज मनोज जरांगे पाटील यांची दुपारी दोन वाजता जाहिर सभा आहे. सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. याशिवाय जिल्ह्यात इतर ठिकाणी देखील जरांगे पाटील यांच्या सभा होणार आहेत.

  • 05 Oct 2023 11:33 AM (IST)

    Nagpur : नागपूरच्या मेयो, मेडीकलमध्ये तीन दिवसांत 63 मृत्यू

    नागपूरच्या मेयो, मेडीक रूग्नालयात तीन दिवसांत 63 मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी अनेक रूग्ण हे इतर रूग्णालयातून रेफर होऊन आलेले असतात. त्यांनी परिस्थिती अत्यंत खालावलेली आणि गुंतागुंतीची असते. दोन्ही रूग्नालयात रोज हजारोंच्या संख्येने रूग्ण उपचारासाठी येत असतात.

  • 05 Oct 2023 11:20 AM (IST)

    Mahadev Betting App : महादेव ऑनलाईन बेटिंग अॅप प्रकरणी आणखी कलाकार अडचणीत सापडणार?

    महादेव ऑनलाईन बेटिंग अॅप प्रकरणी आणखी कलाकार अडचणीत सापडण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. अनेक सेलिब्रेटींनी महादेव बेटिंग अॅपची जाहिरात केल्याचे उघड झाले आहे. यामध्ये अमिषा पटेल, श्रद्धा कपूर, इम्रान आणि बोमन इराणींचे व्हिडीओ समोर आले आहेत. या जाहिरातीसाठी कलाकारांनी मोठी रक्कम घेतल्याचे उघड झाले आहे.

  • 05 Oct 2023 11:11 AM (IST)

    Maharashtra News : तपास यंत्रणांना घाबरून शिंदे पळाले- संजय राऊत

    ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधला आहे. तपास यंत्रणांना घाबरून शिंदे पळाले अशी टिका संजय राऊत यांनी केली आहे. तपास यंत्रणांचा वापर करून पक्ष फोडल्याचा आरोपही त्यांनी केला.

  • 05 Oct 2023 10:43 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांचा राज्यव्यापी दौरा, आज सोलापूरमध्ये सभा

    मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात मनोज जरांगे पाटील सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. आज त्यांची सोलापूरमध्ये जाहीर सभा होणार आहे. तसेच पंढरपूर, मंगळवेढा आणि कुर्डूवाडीमध्येही त्यांची सभा पार पडेल.

  • 05 Oct 2023 10:33 AM (IST)

    लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीची समन्वय समिती ठरली

    लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीची समन्वय समिती ठरली. तीनही पक्षांचे प्रत्येकी तीन सदस्य या समन्वय समितीमध्ये असतील.

    ठाकरे गटाकडून संजय राऊत, विनायक राऊत , अनिल देसाई समितीमध्ये असतील. काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, बसवराज पाटील, नसीम खान तर शरद पवार गटातून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख यांचा समितीमध्ये समावेश असेल.

  • 05 Oct 2023 10:15 AM (IST)

    डोंबिवलीत पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया

    डोंबिवलीत एमआयडीसी येथे मध्यरात्रीच्या सुमारास पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलं. पिंपळेश्वर सीएनजी पंप जवळ 600 एमएमची पाईपलाईन फुटली.

    पाईपलाईनचे दुरूस्तीचे काम युद्ध पातळी वर सुरू आहे. मात्र अचानक पाईपलाईन फुटल्यामुळे डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील निवासी भाग व अनेक गावांत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

  • 05 Oct 2023 10:07 AM (IST)

    आज ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक

    आज सकाळी ११ वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. बेलापूर ते पनवेल मार्गावल ११ पर्यंत लोकल धावणार नाहीत.

    यार्ड रीमॉडलिंगच्या कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. प्रवाशांचे मात्र मोठे हाल होत आहेत.

  • 05 Oct 2023 09:41 AM (IST)

    Pune News | वीजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

    पुणे जिल्ह्यातील सुपे परिसरातील दंडवाडी उत्तर खोपवाडी भागातील शहाजी रामचंद्र चांदगुडे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. शेतात वाफा तयार करत असतानाच विजेच्या खांबाच्या ताणतरेला त्याचा स्पर्श झाला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

  • 05 Oct 2023 09:29 AM (IST)

    Sanjay Raut | देवेंद्र फडणवीस खोटारडे - संजय राऊत

    देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील सर्वात खोटारडे व्यक्ती आहेत. त्यांनी आतापर्यंत काय केले आहे, ते सांगावे. ज्यांना सिंचन घोटाळा प्रकरणी तुरुंगात टाकणार होते, त्यांच्याबरोबर फडणवीस सत्तेत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

  • 05 Oct 2023 09:18 AM (IST)

    Sanjay Raut | सरकार निष्क्रीय, वाद समोर - संजय राऊत

    नांदेडमध्ये मृत्यूचे तांडव सुरु आहे. सरकारमधील वाद समोर येत आहे. कोणाला पालकमंत्री पद हवे आहे, कोणाला मंत्रिमंडळाचा विस्तार हवा आहे. हे महाराष्ट्राचे दुर्देव असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

  • 05 Oct 2023 09:08 AM (IST)

    samruddhi mahamarg | समृद्धी महामार्ग राहणार बंद

    समृद्धी महामार्गावर पॉवरग्रिड ट्रान्समिशनच्या उच्चदाब वाहिनीच्या टॉवरचे काम करण्यात येणार आहे. यासाठी १० ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबरला १२ ते ३:३० आणि २५ आणि २६ ऑक्टोबरला १२ ते ३ समृद्धी महामार्गवर छत्रपती संभाजीनगर ते जालना वाहतुकीस बंद राहणार आहे. यावेली पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

  • 05 Oct 2023 08:57 AM (IST)

    NCP | राष्ट्रवादी काँग्रेसकडून देशभरात जातीनिहाय जनगणनेची मागणी

    "देशाची रचना हजारो वर्ष जातींच्या उतरंडीवर उभी आहे. म्हणूनच आजच्या घडीला देशात विकासाची धोरणे आखताना कोणत्या जातीची नक्की संख्या किती आहे, हे निर्धारित होणे अत्यंत आवश्यक आहे"

  • 05 Oct 2023 08:54 AM (IST)

    Pune News | पुण्यात दुचाकी शोरूमला आग

    सिंहगड रस्ता, नवशा मारुती मंदिरामागे असलेल्या टिव्हीएस सर्व्हिस सेंटरला आग लागली. अग्निशमन दलाची 5 वाहने घटनास्थळी दाखल झाली. आग विझवण्याचे काम सुरू. 25 दुचाकी वाहने आगीत जळून खाक. सकाळी पावणे आठच्या सुमारास लागली आग.

  • 05 Oct 2023 08:33 AM (IST)

    Sharad Pawar | शरद पवार मोठे निर्णय घेण्याची शक्यता

    आज दिल्लीत शरद पवार गटाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक. कार्यकारिणीत शरद पवार मोठे निर्णय घेण्याची शक्यता. शरद पवार लावणार हजेरी. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर शरद पवारांचे पोस्टर. आज 11 वाजता दिल्लीत कार्यकारिणीच आयोजन. उद्या केंद्रीय निवडणूक आयोगात पक्ष आणि चिन्हाची सुनावणी. त्या आधीच घडामोडीना वेग.

  • 05 Oct 2023 08:18 AM (IST)

    Eknath Shinde | मातोश्रीच्या बाहेर शिवसेना शिंदे गटाची बॅनरबाजी

    ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात बॅनर वॉर रंगल आहे. वाघनखं परत भारतात आणण्यात येणार आहेत. त्यावरुन ही बॅनरबाजी सुरु आहे. शिंदे सरकारने घेतले व्रत, छत्रपतींची घेऊन शपथ शिंदे सरकार चालते पथ , असा बॅनरवर आशय आहे. उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहत असलेल्या मातोश्रीच्या बाहेरच हा बॅनर लागल्याने पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे यांच्यामध्ये वैचारिक बॅनर वॉर रंगल्याची चर्चा.

  • 05 Oct 2023 08:00 AM (IST)

    rain : कोकणातून पाऊस जाणार? हवामान खात्याचा अंदाज काय?

    कोकणातून जवळजवळ पाऊस जाण्याची चिन्हे आहेत. कोकणात आता मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी आहे. त्यामुळे 7 ऑक्टोबरपर्यंत हवामान खात्याचा पावसाचा कोणताच इशारा नाहीये.

  • 05 Oct 2023 07:48 AM (IST)

    nagpur hospital : नागपूर मेयो आणि मेडिकल रुग्णालयात तीन दिवसात 63 रुग्णांचा मृत्यू, राज्यात खळबळ

    नागपूर मेयो आणि मेडिकल रुग्णालयात तीन दिवसात 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात मेडिकलमध्ये 43 आणि मेयोत 20 अत्यवस्थ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. खासगी रुग्णालयातून शेवटच्या क्षणी अत्यवस्थ रुग्ण येत असल्याने आकडा अधिक असल्याचं उघड झालं आहे. मात्र, रुग्णालयाती मृतांचा आकडा मोठा असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

  • 05 Oct 2023 07:32 AM (IST)

    chandrakant patil : चंद्रकांत पाटील यांची पालकमंत्री म्हणून पुण्यात शेवटची बैठक, अधिकाऱ्यांशी साधणार संवाद

    चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. पुण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची ही शेवटची बैठक आहे. अजित पवार पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटील आज जिल्हा नियोजन समितीची पुण्यात बैठक घेणार आहेत. यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या साडेचारशे कोटींच्या कामांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. पुण्यातील सर्किट हाऊस येथे आज दुपारी ही बैठक होणार आहे.

  • 05 Oct 2023 07:28 AM (IST)

    sikkim flood : पुरात वाहून गेलेल्या 22 जवानांचं काय झालं?; तिस्ता नदीत शोध सुरूच

    सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यातील लोनाक खोऱ्यात अचानक आलेल्या पुरामुळे तिस्ता नदीला भयंकर पूर आला आहे. या नदीत 23 जवानांसह 48 कर्मचारी बेपत्ता झाले होते. त्यापैकी एका जवानाला वाचवण्यात यश आलं आहे. तर 22 जवान अजूनही बेपत्ता आहेत.

Published On - Oct 05,2023 7:20 AM

Follow us
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.