AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करोडपती युट्यूबरने पॉडकास्टमध्येच पत्नीला दिला घटस्फोट; नेटकरी हैराण!

या प्रसिद्ध युट्यूबरने पॉडकास्टमध्येच पत्नीला घटस्फोट देत असल्याचं जाहीर केलं आणि तिला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. लग्नाच्या अवघ्या दीड वर्षातच त्याने पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

करोडपती युट्यूबरने पॉडकास्टमध्येच पत्नीला दिला घटस्फोट; नेटकरी हैराण!
रजब बट्ट आणि त्याची पत्नीImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 11, 2026 | 8:47 AM
Share

पाकिस्तानातील सर्वांत श्रीमंत युट्यूबर आणि अत्यंत आलिशान लाइफस्टाइलसाठी ओळखला जाणारा रजब बट्ट सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. एका पॉडकास्टदरम्यान त्याने पत्नी ईमान फातिमाला घटस्फोट देत असल्याचं जाहीर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. त्यानंतर आता रजबने पत्नीला घटस्फोटाची कायदेशीर नोटीससुद्धा पाठवली आहे. घटस्फोटाची नोटीस सोशल मीडियावर शेअर करत ईमानने सर्वांना याबद्दलची माहिती दिली आहे. लग्नाच्या दीड वर्षानंतरच रजबने पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. रजबने माझ्यावर खोटे आरोप करत मला आणि माझ्या चिमुकल्या मुलाला एकटं सोडलंय, असा आरोप ईमानने केला आहे. रजबने पॉडकास्टमध्ये म्हटलं की तो आता खोटं आणि बनावट संबंध ठेवण्याच्या बाजूने नाही. इतकंच नव्हे तर त्याने त्याची पत्नी आणि सासरच्या लोकांवरही बरेच आरोप केले आहेत.

“या लग्नात माझा कोणताही आदर नव्हता. माझ्या पत्नीने माझ्या आईचा अपमान केला. तिच्या कुटुंबातील सदस्यांनी माझ्या वडिलांच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित केले. आता मी माझ्या पालकांचा आणखी अनादर सहन करू शकत नाही. त्यामुळे मी या नात्याला आणखी एक संधी देणार नाही. कारण माझ्या लग्नाला दीड वर्ष झालं आहे, परंतु माझी पत्नी फक्त दीड महिना माझ्यासोबत होती”, असे आरोप त्याने पॉडकास्टमध्ये केले. याआधी ईमानच्या भावाने रजबवर पत्नीच्या गरोदरपणादरम्यान तिची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. यावर त्याने प्रतिक्रियासुद्धा दिली होती. माझं एक अफेअर होतं, जे संपायला थोडा वेळ लागला, अशी कबुली त्याने दिली होती. यावेळी त्याने त्याची चूकसुद्धा स्वीकारली आणि पत्नीची माफी मागितली होती.

दुसरीकडे ईमानने घटस्फोटाची नोटीस सोशल मीडियावर शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘हे नातं वाचवण्यासाठी मी गप्प बसले होते. तरीही एका पॉडकास्टमध्ये माझ्यावर खोटो आरोप करण्यात आले आणि त्यानंतर ही कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. मला फक्त एवढंच विचारायचं आहे की माझं आणि माझ्या मुलाचं काय चुकलंय? मला खूप काही सांगायचं आहे. पण रमजान महिन्याचं पावित्र्य लक्षात घेऊन मी अजूनही गप्प आहे’, असं तिने म्हटलंय.

2024 मध्ये रजब आणि ईमान यांचा निकाह पार पडला होता. या दोघांचा लग्नसोहळा पाकिस्तानमधील सर्वांत भव्य लग्नसोहळ्यांपैकी एक होतं. या लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी