AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : राज्यसभेवर जाताच शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना शब्द, तुम्हाला मी..

Sharad Pawar : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा पोटनिवडणुकांची चर्चा आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे.

Sharad Pawar : राज्यसभेवर जाताच शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना शब्द, तुम्हाला मी..
Sharad Pawar
| Updated on: Apr 04, 2026 | 2:09 PM
Share

“मला राज्यसभेवर पाठवण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी सहकार्य केलं. उद्या जेव्हा विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून जे कुठलं नाव येईल त्याला आम्ही सहकार्य करु. आमचा पाठिंबा असेल” पत्रकरांशी अनऔपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांनी ही आपली भावना बोलून दाखवली. “मला राज्यसभेवर पाठवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने सहकार्य केलं. भविष्यात विधान परिषदेच्यावेळी ठाकरे जो कुठला उमेदवार देतील त्याला पाठिंबा देऊ” असं शरद पवार म्हणाले. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे कोणाला संधी देणार? की ते स्वत: पुन्हा सभागृहात जाणार हे अद्याप ठरलेलं नाही. शरद पवार यांचा येत्या 6 एप्रिलला राज्यसभेचा शपथविधी आहे. त्यासाठी ते दिल्लीला रवाना होणार आहेत.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा पोटनिवडणुकांची चर्चा आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी सर्वच पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवार असतील. पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा मिळावा यासाठी काल सुनेत्रा पवार यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना फोन केला होता.

ठाकरे,शरद पवारांनी पत्ते उघड केलेले नाहीत

बारामती आणि राहुरी या दोन्ही विधानसभा पोटनिवडणुका लढवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसने या दोन्ही विधानसभा मतदार संघात उमेदवार देणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने बारामती विधानसभा पोटनिवडणुकी बाबत अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. “मला असं वाटतं की, सर्वच पक्षांनी सुनेत्रा ताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी सर्वांना विनंती आहे की, ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी. याआधी महाराष्ट्रात बिनविरोध पोटनिवडणूक झाली आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...