AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मातोश्रीवर बाळासाहेबांचा मृतदेह, विनायक राऊतांनी सरण रचलं अन्…, संजय शिरसाट यांच्या गौप्यस्फोटानं खळबळ

रामदास कदम यांनी बाळासाहेबांबद्दल बोलताना खळबळजनक आरोप केले होते, बाळासाहेबांचा मृतदेह मातोश्रीवर दोन दिवस ठेवला होता, असं कदम यांनी म्हटलं. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना आता संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मातोश्रीवर बाळासाहेबांचा मृतदेह, विनायक राऊतांनी सरण रचलं अन्..., संजय शिरसाट यांच्या गौप्यस्फोटानं खळबळ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2025 | 4:10 PM
Share

गुरुवारी मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला, या दसरा मेळाव्यात बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी खळबळजनक आरोप केला आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह मातोश्रीवर दोन दिवस ठेवण्यात आला होता, त्यांच्या हाताचे ठसे घेतले गेले, असा आरोप कदम यांनी केला आहे. तसेच याचा तपास व्हायला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. दरम्यान कदम यांच्या या आरोपानंतर आता राजकारणात वातावरण चांगलंच तापलं आहे. कदम यांच्यानंतर आता मंत्री संजय शिरसाट यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नेमकं काय म्हणाले शिरसाट?   

त्या काळात मी देखील मातोश्रीला होतो. विनायक राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी तिथे तयारी सुरू केली होती. त्यावेळच्या पोलीस कमिश्नर यांनी विचारलं काय झालं? आणि मग दिवाकर रावते आणि त्यांनी तिथे जाऊन ती सर्व तयारी डिमॉलिश केली.  शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं होतं, त्यानंतर विनायक राऊत यांनी रचलेलं सरण पुन्हा काढलं, ही झालेली गोष्ट आहे. म्हणून कदम यांनी चुकीचा आरोप केला असं मी म्हणणार नाही, असा मोठा गौप्यस्फोट यावेळी शिरसाट यांनी केला आहे.  दरम्यान पुन्हा यावर चर्चा करून मला बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला दुखावयला आवडणार नाही, त्यामुळे त्यावर मी जास्त बोलणार नाही, असंही यावेळी शिरसाट यांनी म्हटलं आहे.  

दरम्यान कालच्या दसरा मेळाव्याला संजय शिरसाट यांची उपस्थिती नव्हती, त्यामुळे शिरसाट नाराज आहेत, अशी चर्चा सुरू झाली. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठवाड्यातील कोणीही येऊ नये, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं होतं, म्हणून आम्ही आलो नाही, त्यांनी मराठवाड्यातील नेत्यांना फिल्डवरच राहण्याचे आदेश दिले होते, त्यामुळे आम्ही सर्व आमच्या कामात होतो.  नाहीतर आम्ही देखील तिथे खुर्चीवर बसलेले दिसलो असतो, असं यावेळी संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना निवडणूक आली की हिंदूत्व आठवतं असा टोलाही यावेळी शिरसाट यांनी लगावला आहे.  

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...