AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिकांच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, अखेर भाजपनं डाव साधला, राजकारणातून मोठी बातमी

महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळवता आलं नाही, त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असून, भाजपनं मोठी खेळी केली आहे, राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.

महापालिकांच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, अखेर भाजपनं डाव साधला, राजकारणातून मोठी बातमी
uddhav thackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 18, 2026 | 7:09 PM
Share

महापालिका निवडणुकीचा निकाला हाती आला आहे, राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, राज्यातील काही मोजक्या महापलिका वगळता सर्वच महापालिकांमध्ये भाजप आणि युतीची सत्ता आली आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला देखील राज्यात चांगलं यश मिळालं, या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला. तर काँग्रेसला देखील चांगलं यश मिळालं. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक फटका हा दोन्ही राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गटाला बसला. तर शिवसेना ठाकरे गटाला देखील या महापालिका निवडणुकीत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटानं मनसेसोबत युती केली होती. मात्र इथेही त्यांना धोबीपछाड मिळाला, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला स्पष्ट बहुमत मिळालं. दरम्यान आता मुंबईमध्ये महापौर कोणाचा होणार याची चर्चा सुरू असतानाच, भाजपनं उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. शहरात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता गोर्डे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  दत्ता गोर्डे हे शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख आहेत. दत्ता गोर्डे यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना परभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर  आता पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये दत्ता गोर्डे यांच्या पत्नी यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचाही परभाव झाला, त्यानंतर आता  दत्ता गोर्डे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ते उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, उद्या दत्ता गोर्डे हे भाजपचे मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड, माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

दरम्यान नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या काळात देखील भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झालं, त्यावेळी देखील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता, दरम्यान आता महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर देखील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...