नगरमध्ये जंतुनाशक फवारणाऱ्या अधिकाऱ्यांना मारहाण, बीडमध्ये पालिका मुख्याधिकाऱ्याचा मेडिकल चालकाला चोप

मेडिकलच्या दुकानात गर्दी जमल्याने बीड नगरपालिका मुख्याधिकाऱ्याने मेडिकल चालकाला काठीने मारहाण केली.

नगरमध्ये जंतुनाशक फवारणाऱ्या अधिकाऱ्यांना मारहाण, बीडमध्ये पालिका मुख्याधिकाऱ्याचा मेडिकल चालकाला चोप

बीड/अहमदनगर : मेडिकलच्या दुकानात गर्दी जमल्याने बीडमध्ये नगरपालिका मुख्याधिकाऱ्याने मेडिकल चालकाला काठीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर अहमदनगरमध्ये चक्क जंतुनाशक औषध फवारणीचे काम करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनाच मारहाण झाल्याची संतापजनक घटना घडली. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून फवारणी केली जात आहे. (Ahmednagar Municipal Officers Beaten up)

‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. संचारबंदी न जुमानणाऱ्या नागरिकांविरोधात बीड नगरपालिका प्रशासन आक्रमक झालं आहे. मेडिकलच्या दुकानात गर्दी जमल्याने नगरपालिका मुख्याधिकाऱ्याने मेडिकल चालकाला काठीने मारहाण केली.

भाजीपाला विक्रेते आणि आडत दुकानदारानेही मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. या मारहाणीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. मारहाणीच्या प्रकारानंतर बशीरगंज परिसरात तणावपूर्व वातावरण होतं. उद्यापासून संपूर्ण मार्केट बंद ठेवण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

पहा व्हिडीओ :

दरम्यान, अहमदनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही जबर मारहाण करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना सात ते आठ नागरिकांनी मारहाण केली. एमआयडीसी आणि बोल्हेगाव भागात जंतुनाशक औषध फवारणीचे काम करताना हा प्रकार घडला. जखमी कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘कोरोना’चे संकट मोठे असतना जिवाची बाजी लावून प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर सेवा देत आहे. ‌मात्र नागरिकांकडून याच प्रशासकीय यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असल्याने नागरिकांसह महानगरपालिकेच्या  अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त होऊ लागला आहे.

(Ahmednagar Municipal Officers Beaten up)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *