लोकसभेच्या सगळ्याच जागा महायुतीला मिळतील!; कुणाचं विधान?

Chirag Paswan on Loksabha Election 2024 and Naredra Modi : महायुतीला घवघवीत यश मिळणार; 'या' नेत्याकडून विश्वास व्यक्त... कुणी केलं हे विधान? शिर्डीत बोलताना एका राजकीय नेत्याने सर्वच्या सर्व जागा महायुतीला मिळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर...

लोकसभेच्या सगळ्याच जागा महायुतीला मिळतील!; कुणाचं विधान?
Follow us
| Updated on: Mar 21, 2024 | 3:54 PM

मनोज गाडेकर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, शिर्डी | 21 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं आहे. अशात सर्वच राजकीय पक्षांकडून विजयाचा दावा केला जात आहे. महायुतीला घवघवीत यश मिळेल, असा दावा बिहारमधील लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी व्यक्त केला आहे. लोकजनशक्ती पार्टीचे चिराग पासवान सहपरिवार साई दरबारी हजेरी लावली. लोकसभा निवडणुकी अगोदर चिराग पासवान यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. दुपारच्या मध्यान्ह आरतीला ते सहकुटुंब उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

महायुती यश मिळणारच- पासवान

आताच्या लोकसभेच्या निवडणुकीत बिहारमध्ये महायुतीला किती जागा मिळतील, असं वितारण्यात आलं. तेव्हा बिहारच्या गावागावात मी अडीच तीन वर्ष फिरलो आहे. बिहारमधील 40 पैकी 40 जागा एनडीएला मिळतील. लोक जनशक्ती पार्टीच्याही सर्वच्या सर्व पाच जागा जिंकू. 400 पार जागा जिंकण्याचं आमचं स्वप्न आहे. त लक्ष आहे ते पूर्ण करू, असं चिराग पासवान म्हणाले.

विरोधकांवर निशाणा

नितीश कुमार तेजस्वी सोबत होते तेव्हा सर्वात चांगले होते, असं विरोधकांना वाटतं. सत्तेत राहण्याचा मोह विरोधकांना आहे. खास करून आरजेडी सत्तेत कसं यावं यासाठी नेहमी ते प्रयत्नात असतात. विविध आघाडी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र शेवटी जनता सर्व निर्धारित करते. जनतेने ठरवलय 40 जागा एनडीए जिंकेल. आमची ताकद वाढलीय, असंही चिराग पासवान म्हणालेत.

“…म्हणून साईंच्या चरणी लीन”

लोकसभा निवडणुका समोर आहेत. त्यामुळे मनात इच्छा होती की, निवडणुकीच्या रिंगणात उतरण्या अगोदर एकदा साईबाबांचे दर्शन घ्यावे. त्यामुळे सह परिवार आज दर्शनासाठी आलोय. देशवासीयांसाठी येणारा काळ उत्तम काळ असणार आहे. भारताला पुन्हा एकदा मजबूत सरकार मिळो…अशी अपेक्षा घेऊन आज दर्शनासाठी हजेरी लावलीय, असं चिराग पासवान म्हणाले.

माझे वडील रामविलास पासवान यांच्या आठवणी येथे आल्यानंतर ताज्या झाल्या. मी शिर्डीला अगोदर वडीलांसोबत आलो होतो. त्यांचे आशिर्वाद आमच्या सोबत आहेत. कठीण काळात त्यांचे आशिर्वाद सोबत होते. त्यांचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं आहे, असं चिराग पासवान यांनी म्हटलं.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.