AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वात धक्का, राजीनामा सत्र सुरूच, थेट अध्यक्षपदाचा…

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अत्यंत मोठा झटका बसताना दिसतोय. थेट अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यात आला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा धक्का बसला. बीड जिल्ह्यांत अजित पवारांच्या पक्षाची मोठी ताकद बघायला मिळते.

मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वात धक्का, राजीनामा सत्र सुरूच, थेट अध्यक्षपदाचा...
Ajit Pawar
| Updated on: Nov 15, 2025 | 8:36 PM
Share

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.  निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंर्भात महत्त्वाच्या तारखांची घोषणा केली. 2 डिसेंबर रोजी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता मोठ्या घडामोडी राजकीय पक्षांमध्ये बघायला मिळत आहेत. आता बीड जिल्ह्यांत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अत्यंत मोठा धक्का बसला आहे. बीड जिल्ह्यांतील पुढील काळातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलल्याचे बघायला मिळेल.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बीड विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राम राम ठोकल्यानंतर योगेश क्षीरसागर आता कमळ हाती घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत सातत्याने डावलल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. अजित दादांच्या राष्ट्रवादीची बीडमध्ये मोठी ताकद बघायला मिळते. मात्र, निवडणूक तोंडावर असतानाच राजीनामा सत्र सुरू आहे.

बीड नगरपरिषद निवडणुकीमध्ये क्षीरसागर आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांमध्ये दुमत निर्माण झाले. जागा वाटपावरून योगेश क्षीरसागरांनी स्वतंत्र आघाडी तयार करून नगरपरिषद निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. स्वतंत्र आघाडी ही भाजपसोबत युती करून लढणार असल्याची माहिती होती. मात्र, खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेला माहितीनुसार योगेश क्षीरसागर हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे‌.

दरम्यान योगेश क्षीरसागर यांनी आपल्या बीड विधानसभा अध्यक्षपदाचा काही वेळापूर्वीच राजीनामा दिला आहे. याबाबतची फेसबुक पोस्ट देखील त्यांनी केली आहे. राजीनाम्यामध्ये स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत सातत्याने डावलल्याने राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक युवा नेता बीडमधून भाजपच्या गळाला लागल्याचं स्पष्ट होतंय. आता योगेश क्षीरसागर हे कधीपर्यंत भाजपमध्ये प्रवेश करतात किंवा पुढची त्यांची भूमिका कधी स्पष्ट करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या...

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या..

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !.

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक