परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला, अकोल्याच्या पोलीस अधिकाऱ्याचा गंभीर आरोप

| Updated on: Apr 26, 2021 | 7:29 PM

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे (Akola police officer allegation of corruption on Parambir Singh).

परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला, अकोल्याच्या पोलीस अधिकाऱ्याचा गंभीर आरोप
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सोमवारी हजर राहण्याचे चांदिवाल आयोगाचे आदेश
Follow us on

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. अकोल्याच्या पोलीस निरीक्षक पदावरील एका अधिकाऱ्याने याबाबतचे गंभीर आरोप केले आहेत. पोलीस अधिकाऱ्याने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनाही पत्र पाठवले आहे. संबंधित वृत्त पीटीआयच्या हवाल्याने समोर आलं आहे. दरम्यान, अकोल्याच्या पोलीस अधिकाऱ्याच्या या नव्या लेटरबॉम्बचा महाराष्ट्रातील आगामी राजकीय घडामोडींवर परिणाम होण्याची शक्यता आहे (Akola police officer allegation of corruption on Parambir Singh).

ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना भ्रष्टाचार केल्याचा दावा

परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्या रकमेची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक केली. परमबीर सिंग यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या व्यवसायात त्या पैशांची गुंतवणूक केली, असा आरोप पत्रात करण्यात आला आहे (Akola police officer allegation of corruption on Parambir Singh).

पत्रात कुटुंबियांवर नेमका आरोप काय?

परमबीर सिंग यांच्या पत्नी यांचं इंडिया बुल्समध्ये कार्यालय आहे. तिथे हजारो कोटी गुंतवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांचा मुलगा रोहन हा सिंगापूरमध्ये एक मोठा व्यवसाय चालवतो. तिथे देखील भ्रष्टाचाराचे पैसे गुतंवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

परमबीर सिंग यांच्यावरील आरोपांचं हे दुसरं पत्र

विशेष म्हणजे परमबीर सिंग यांच्यावर आरोप करणारं हे दुसरं पत्र आहे. याआधी मुंबईतीलच एका पोलीस अधिकाऱ्याने अशाप्रकारे आरोप करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालकांना पाठवलं होतं. मात्र, आता अकोल्यात मुख्य नियंत्रण कक्षामध्ये काम करणाऱ्या एका पोलीस निरीक्षकाने पत्र पाठवलं आहे. संबंधित पत्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागालादेखील पाठवण्यात आलं आहे.

हेही वाचा :

परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध? पोलीस निरीक्षक अनुप डांगेंच्या आरोपांचीही चौकशी होणार

कोरोनाची दुसरी लाट भयंकर, आता घरातही मास्क लावण्याची वेळ आलीय : केंद्र सरकार