PHOTO | अकोल्यातील धक्कादायक प्रकार, नामांकित बेकरीने बुरशीजन्य ब्रेड विकल्याची तक्रार

अकोला शहरातील एका नामांकित बेकरीने चक्क बुरशीजन्य ब्रेड विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Akola reputed bakery selling fungal bread)

1/5
अकोला शहरातील एका नामांकित बेकरीने चक्क बुरशीजन्य ब्रेड विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

2/5
अकोला शहरातील शास्त्री नगर परिसरात एका दुकानातून अश्विन श्यामकुमार लोहिया यांनी आनंद बेकरीचा ब्रेड विकत घेतला. या दोन ब्रेडच्या पॅकसाठी त्यांनी 24 रुपये मोजले.

3/5
त्यानंतर घरी जाऊन पॅक उघडल्यानंतर त्यात चक्क बुरशीजन्य ब्रेड आढळून आला. यानंतर त्यांनी याबाबत आनंद बेकरीच्या संचालकासोबत संपर्क साधला असता त्यांनी ही फार साधी गोष्ट असल्याचे सांगितले.

4/5
यानंतर लोहिया यांनी थेट रामदासपेठ पोलीस स्टेशनला याबाबतची तक्रार दाखल केली. मात्र त्यावेळीही आनंद बेकरीकडून पैसे घेऊन पैसे मिटवा, असे सांगत तक्रार मागे घेण्यास सांगण्यात आला, असा आरोप लोहिया यांनी केला आहे.

5/5
मात्र यानंतर लोहिया यांनी याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनासोबत संपर्क साधला. मात्र याबाबत अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI