AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, हर्षवर्धन सपकाळ यांच्या दाव्यानं खळबळ, प्रकरणात मोठा ट्विस्ट

पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे, दरम्यान आता या प्रकरणात हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या नव्या दाव्यामुळे मोठा ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे.

पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, हर्षवर्धन सपकाळ यांच्या दाव्यानं खळबळ, प्रकरणात मोठा ट्विस्ट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 06, 2025 | 8:11 PM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे, या आरोपामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील चाळीस एकर जमीन ही अवघ्या तीनशे कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप होत आहे, ज्या जमिनीची किंमती ही प्रत्यक्षात 1800 कोटी रुपये एवढी आहे. एवढंच नाही तर तीनशे कोटी रुपयांचा व्यवहार केल्यानंतर नियमानुसार दोन टक्क्यांनी 6 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क भरण अपेक्षित असताना केवळ 500 रुपयेच भरल्याचं देखील समोर आलं आहे. यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित केल्याची माहिती देखील समोर आली होती, मात्र या प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या दाव्यामुळे मोठं ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे.  सपकाळ यांनी या प्रकरणात मोठा दावा केला आहे, त्यांनी ट्विट करत त्या संदर्भातील कागदपत्रं देखील शेअर केली आहेत.

नेमकं काय म्हणाले सपकाळ?

‘पुण्याचे तहसीलदार सुर्यकांत येवले यांना पार्थ पवार जमीन हडपण्याच्या प्रकरणात नाही तर पुण्याच्या बोपोडी येथील सर्वे नं. ६२ मधील अॅग्रीकल्चर डेअरीची शासकीय मालकीची जागा खासगी व्यक्तीस दिल्याप्रकरणी निलंबित केले आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने सरकारची ४० एकर जमीन हडपल्याच्या प्रकरणात तहसीलदार येवले याला अटक केल्याच्या बातम्या पसरवून हे दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे. शीतल तेजवानी यांनी शासनाच्या मालकीच्या जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून त्या जमिनीची विक्री केलेली आहे. त्यांनी शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आणि खरेदी करणा-या अमेडिया कंपनीविरोधातही गुन्हा दाखल केला पाहिजे. फक्त दुय्यम निबंधकाला निलंबित करून चालणार नाही. जमिनीची विक्री करणारे आणि खरेदीदार या दोघांवरही खोटे दस्तावेज बनवून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे.’ असं ट्विट सपकाळ यांनी केलं आहे.

दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी अजित पवार यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. अजित पवार यांना भस्म्या नावाचा आजार झाला आहे, भस्म्या नावाचा आजार झाल्यावर किती खाल्लं तरी अधिक खावच वाटतं, आधीच एवढं खाल्लेलं आहे अजून किती खाणार? असा हल्लाबोल सपकाळ यांनी यावेळी केला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...