AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित ठाकरे आक्रमक; छत्रपती शिवरायांच्या शेजारी असलेला मोदींचा फोटा हटवला

अमित ठाकरे आक्रमक; छत्रपती शिवरायांच्या शेजारी असलेला मोदींचा फोटा हटवला

अमित ठाकरे आक्रमक; छत्रपती शिवरायांच्या शेजारी असलेला मोदींचा फोटा हटवला
amit thackeray newsImage Credit source: tv9
| Updated on: Aug 31, 2026 | 2:44 PM
Share

पुण्यातील एका कॉलेजमध्ये अमित ठाकरे पोहोचले आहेत. या कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर अमित ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी कॉलेजमधील वसतीगृह अधीक्षकांच्या कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी असलेल्या पंतप्रधान मोदींचा फोटो हटवायला लावला. फोटो हटवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातून मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या सुविधांची पाहणी करण्यास गेलेले मनसे नेते अमित ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेची जोरदार चर्चा होत आहे. या कॉलेजमध्ये गेल्यावर अमित ठाकरे यांनी कँटिनमध्ये मिळणारे जेवण आणि खेळाडूंना प्रशिक्षक मिळत नसण्यावरून कॉलेजच्या अधीक्षक, मुख्याध्यापकांना जाब विचारला. यावेळी एका विद्यार्थ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधान मोदींचा फोटो असल्याचे सांगितले. त्यानंतर अमित ठाकरे यांनी मोदींचा फोटो काढण्यास सांगितला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्याने तातडीने पंतप्रधान मोदींचा फोटो खाली उतरवला. फोटो काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता फोटो हटवण्यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे दौऱ्यावर असलेले अमित ठाकरे हे पुण्यातील सात कॉलेजला भेट देणार आहेत. तसेच कॉलेजमधील जेन-झी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अनेक उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. ते पुण्यात शैक्षणिक भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडणार आहेत. त्याचबरोबर कॉलेजबाहेर सिगारेट, गुटखा विक्रीविरोधातही कारवाईची मागणी करणार आहेत.

अमित ठाकरे विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार

अमित ठाकरे हे रक्षाबंधन कार्यक्रम, वाडिया कॉलेज परिसरातील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करण्याचा कार्यक्रमाचाही समावेश आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून ठाकरे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अमित ठाकरेंनी हा दौरा आखल्याचे सांगण्यात येत आहे.

Follow Us
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम