AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : पुण्यात 26 मेपासून 14 दिवस जमावबंदी लागू, आंदोलन-मोर्चे सभांना बंदी; नेमका आदेश काय?

पुण्यात उद्या रात्रीपासून 14 दिवसांपर्यंत जमावबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आला आहेत. या काळात आंदोलनं, मोर्चे यांवर पूर्णपणे बंदी असेल. या आदेशात नेमकं काय काय म्हटलंय, ते सविस्तर जाणून घ्या..

Pune : पुण्यात 26 मेपासून 14 दिवस जमावबंदी लागू, आंदोलन-मोर्चे सभांना बंदी; नेमका आदेश काय?
पुणे पोलीस (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: Instagram
| Updated on: May 25, 2026 | 12:53 PM
Share

Pune Jamavbandi: पुण्यात उद्या (26 मे) रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाने पुढील 14 दिवस जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचा हा आदेश 26 मे 2026 पासून 8 जून 2026 पर्यंत लागू राहणार आहे. या जमावबंदीच्या काळात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलनं आणि सभा घेण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात शहरातील विविध राजकीय आणि सामाजिक संघटना आक्रम झाल्या आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

पोलीस प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणं, सार्वजनिक ठिकाणी सभा घेणं, मोर्चे किंवा मिरवणुका काढणं यावर पूर्णपणे बंदी आहे. तसंच तलवार, भाला, काठी, लाठी, बंदूक किंवा शारीरिक इजा करू शकेल अशी कोणतीही वस्तू सार्वजनिक ठिकाणी सोबत बाळगण्यास बंदी आहे. कोणतेही दाहक, स्फोटक आणि ज्वलनशील द्रव पदार्थ सोबत नेण्यावर निर्बंध असतील. सार्वजनिक शांतता भंग करू शकतील अशा घोषणा देणं, चिथावणीखोर गाणी किंवा वाद्य वाजवणं यावरही बंदी आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल. बकरी ईद आणि इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

पुणे महानगरपालिकेनंही इंधन बचतीसाठी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना इंधन वापराबाबत काटकसर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे मनपा अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी काही आदेश जारी करण्यात आले आहेत.

आदेशात नेमकं काय म्हटलंय?

  • अधिकाऱ्यांनी एकत्रित दौरा करताना कार पुलिंगद्वारे प्रवास करण्याचं नियोजन करावं.
  • अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजाकरिता आवश्यक दौरे असल्यास सार्वजनिक वाहनांचा वापर करावा.
  • अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील एक दिवस लोकल, मेट्रोने प्रवास करावा.
  • सर्व बैठका, प्रशिक्षण, चर्चासत्रे ऑनलाइन पद्धतीने आयोजित करावेत.

Follow Us
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी...
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी अपडेट
आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन...
Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार सकारात्मक? विखे पाटलांनी दिला सर्वात...
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत...
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; 19 जणांवर गुन्हा दाखल!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा अंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच...
दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं..
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं कारण काय?
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...