AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Death : आमच्या परिवाराचा पांडुरंग नेला, अजितदादांच्या निधनानंतर अमोल मिटकरी भावुक, रडू कोसळलं!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर बारामतीमध्ये 29 जानेवारी रोजी अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या जाण्याने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Ajit Pawar Death : आमच्या परिवाराचा पांडुरंग नेला, अजितदादांच्या निधनानंतर अमोल मिटकरी भावुक, रडू कोसळलं!
ajit pawar and amol mitkariImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 28, 2026 | 4:22 PM
Share

Ajit Pawar  Plane Crash Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले झाले आहे. ते बारामतीच्या दौऱ्यावर होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत ते काही सभांना संबोधि करणार होते. परंतु त्याआधीच प्रवासात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. काही तांत्रिक कारणामुळे लँडिक करताना हा अपघात झाला आहे. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील इतर 5 जणांचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण राज्यासह देशातही हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी आता सगळं संपलं आहे. माझा देव माझ्यापासून निघून गेला आहे, असे म्हणत मिटकरी यांनी आपल्या भावाना व्यक्त केल्या आहेत.

अमोल मिटकरी भावूक

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षातील सर्वच नेत्यांना धक्का बसला आहे. अनेक नेत्यांना तर रडू अनावर झाले आहे. माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी अजितदादांनी मला कधीही वडिलांची कमतरता भासू दिली नाही, असे म्हणत दु:ख व्यक्त केलं. तर अमोल मिटकरी यांनाही रडू कोसळले. अजितदादांच्या निधनाचे वृत्त समजताच अमोल मिटकरी यांनी त्यांच्या एक्स या समाजमाध्यमावर आता सगळं संपलं आहे, असे म्हणत दु:ख व्यक्त केले.

ज्या जिवंत देवाने माझ्या…

तसेच अजितदादा माझ्यासाठी माझे देव होते. माझा देवही आता माझ्यापासून दूर झाला, अशा आशयाची पोस्ट करून त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. ‘आमच्या परिवाराचा पांडुरंग नेला तू. इतक्या वर्षांनी सुखाचे पारिवारिक प्रसंग ज्या जिवंत देवाने माझ्या परिवाराच्या आयुष्यात आणले, त्या देवाला तू घेऊन गेलास. तुझ्यावर विश्वास ठेवला होता पण आता तोही हरवलाय. ही बघ माझी लेकरं माझ्या देवाकडे पाहात आहेत,” असे मिटकरी देवाला उद्देशून म्हणाले आहेत. त्यांनी एक्सवर पोस्ट करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

अजित पवारांच्या पार्थिवावर 29 जानेवारी रोजी अंत्यसंस्कार

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच 28 जानेवारी रोजी सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. 29 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. बारामतीमध्ये सर्व पवार कुटुंबीय जमले आहेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?