AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिट्टेने जशी माजी पंतप्रधान राजीव गांधींची हत्या केली तशीच… अजितदादांच्या अपघातावर अमोल मिटकरी यांचा खळबळजनक दावा..

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने खळबळ उडाली. सतत या प्रकरणात गंभीर आरोप केली जात आहेत. आता पायलटबद्दल धक्कादायक माहिती मिळत आहे. यादरम्यानच अमोल मिटकरी यांनी मोठे आरोप केले.

लिट्टेने जशी माजी पंतप्रधान राजीव गांधींची हत्या केली तशीच... अजितदादांच्या अपघातावर अमोल मिटकरी यांचा खळबळजनक दावा..
Ajit Pawar plane accident
| Updated on: Feb 23, 2026 | 10:58 AM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचारसभांसाठी मुंबईहून सकाळीच बारामतीच्या दिशेने रवाना झाले. मात्र,  28 जानेवारी 2026 ला सकाळी 8.45 ला अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात बारामती विमानतळाच्या धावपट्टीच्या अगदी शेजारी झाला. अजित पवार या विमान अपघातात गंभीर जखमी झाल्याचे सांगितले गेले. मात्र, काही वेळातच त्यांच्या निधनाची बातमी आली. आजही लोकांना विश्वास बसत नाही की, अजित पवार आपल्यात नाहीत. आज राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. राज्याचा हा अर्थसंकल्प अजित पवार मांडणार होते, या अर्थसंकल्पाची तयारीही ते मागील काही दिवसांपासून करत होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ आली. आज प्रत्येक व्यक्तीला अजित पवारांची आठवण अधिवेशनाच्या दिवसी येत आहे.

यादरम्यानच अमोल मिटकरी यांनी अत्यंत खळबळ उडवणारा दावा केला. अमोल मिटकरी यांनी म्हटले की, अजित पवार यांच्या विमान अपघातावेळी पायलट सुमित कपूर हा ,सुसाईड बॉम्बर होता का? लिट्टेने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली तशीच किंवा त्याप्रकारेच अजित पवार यांची हत्या झाली का? सुमित कपूर यांच्या पत्नी सुमित हा जिवंत असल्याचे म्हणताना दिसत आहेत.

मग खरोखरच विमान अपघातात सुमित कपूर यांचे निधन झाले का? असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले. यासोबतच त्यांनी अजित पवार यांच्या विमानाचे अगोदरच ठरलेले पायलट साहिल मदन आणि कॅप्टन यश हे खरोखरच वाहतूककोडींत अडकले होते का? असाही थेट प्रश्न केला. ब्लॅक बॉक्सचे जाऊन द्या सध्या पण सीसीटीव्ही फुटेज का देत नाहीत, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले.

आता अमोल मिटकरी यांनी केलेल्या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या विमानाचे सुरूवातीला ठरवून दिलेले दोन्ही पायलट कुठे आहेत? हा प्रश्न सध्या सातत्याने उपस्थित केला जात आहे. फक्त अमोल मिटकरी हेच नाही तर रोहित पवार हे देखील याप्रकरणात सातत्याने गंभीर आरोप करताना दिसत आहेत.

Follow Us
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक