AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आलिशान थार, पिस्तूल, पैशांचे बंडल अन्… परतवाड्यातील आरोपीचे रॉयल लाईफस्टाईल, व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?

अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील आरोपी अयान अहमदच्या विलासी जीवनशैलीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. थार गाडी, पिस्तूल आणि महागड्या आयफोन्समुळे या प्रकरणामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आलिशान थार, पिस्तूल, पैशांचे बंडल अन्...  परतवाड्यातील आरोपीचे रॉयल लाईफस्टाईल, व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?
Ayan Ahmad
| Updated on: Apr 20, 2026 | 10:01 AM
Share

अमरावतीच्या परतवाडा येथील तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याच्या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद सध्या पोलीस कोठडीत आहे. गेल्या काही दिवसांपासून अयान अहमदची चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान अनेक नवनवीन आणि थक्क करणारे खुलासे दररोज समोर येत आहेत. आता अयान अहमदच्या ऐशो आरामाच्या आयुष्याबद्दलचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

आरोपी अयान अहमद याचे सोशल मीडियावरील रिल्स समोर आले आहेत. ज्यात तो स्वतःचे वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. यातील एका व्हिडीओमध्ये तो अलिशान थार (Thar) गाडीतून फिरताना दिसत आहे. यावेळी त्याच्या हातात पिस्तूल, तसेच कारमध्ये आयफोनच्या फोनचा ढीग पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, एका रिलमध्ये ये जरूर कुछ बडा करेगा… क्योंकि इसे जिंदगी से ज्यादा अपनी जीत प्यारी है, अशा अर्थाचे संवादही वापरण्यात आले आहेत.

नवी कोरी थार गाडी कोणाच्या मालकीची?

या व्हिडीओनंतर पोलिसांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. अयान वापरत असलेली नवी कोरी थार गाडी नेमकी कोणाच्या मालकीची आहे? तो केवळ या गाड्यांचा वापर करायचा की त्या त्याच्या नावावर आहेत, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या पिस्तूलचे अयानकडे कायदेशीर परवाना (License) होते का? की हे अवैध शस्त्र होते? एक तरुण इतक्या महागड्या गाड्या, चार-पाच आयफोन आणि रोख रक्कमेची बंडले कोठून आणत होता? यामागे एखादे मोठे रॅकेट तर नाही ना, अशी शंकाही पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

अमरावती पोलिसांकडून सखोल तपास सुरु

दरम्यान परतवाडा येथील तरुणींच्या लैंगिक शोषणाचे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, यात रोज नवीन धागेदोरे मिळत आहेत. आरोपीने किती मुलींना आपल्या जाळ्यात ओढले आणि त्याचे कनेक्शन कोणाकोणाशी आहे, याचा सखोल तपास अमरावती पोलीस करत आहेत. त्यासोबतच अयानच्या आर्थिक व्यवहारांची आणि त्याच्या आलिशान राहणीमानामागचे खरे सूत्रधार कोण याचा शोध सध्या घेतला जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...