AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कठोरा नाक्यावरील फ्लॅट, स्वतःच्याच मित्रालाच 500…; अमरावती सेक्स स्कँडलप्रकरणी मोठी अपडेट

अमरावतीच्या परतवाडा येथे तरुणींचे लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यावेळी १८ व्हिडिओ आणि ३९ फोटोंसह मुख्य आरोपीसह ६ जण गजाआड झाले आहेत.

कठोरा नाक्यावरील फ्लॅट, स्वतःच्याच मित्रालाच 500...; अमरावती सेक्स स्कँडलप्रकरणी मोठी अपडेट
amravati 1
| Updated on: Apr 16, 2026 | 9:21 AM
Share

अमरावतीच्या परतवाडा परिसरातील तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करणे आणि त्यानंतर ब्लॅकमेलिंगच्या उद्देशाने अश्लील व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधार अहमद अयानसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणाचे धागेदोरे अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील एका रेसिडेन्सीपर्यंत पोहोचले आहेत. नुकत्याच झालेल्या पोलीस तपासातून याबद्दलची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अहमद अयान याची कार्यपद्धती अत्यंत पद्धतशीर आणि गुन्हेगारी स्वरूपाची होती. तो पीडित तरुणींशी ओळख वाढवून त्यांना विश्वासात घ्यायचा. त्यानंतर तो अमरावतीच्या कठोरा नाका भागातील एका नामांकित रेसिडेन्सीमधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटवर त्यांना घेऊन जायचा. या फ्लॅटचा वापर तो स्वतःच्या विकृत कृत्यांसाठी अड्डा म्हणून करत होता.

विशेष म्हणजे, या कृत्यासाठी तो आपल्या मित्रांचाही वापर करत होता. पीडितांना फ्लॅटवर आणण्यासाठी तो स्वतःच्याच मित्राला ५०० रुपयांचे आमिष दाखवत त्याला सहभागी करून घ्यायचा. या फ्लॅटवर अनेक तरुणींना वारंवार आणले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या टोळीचे जाळे किती मोठे आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांकडून पुराव्यांचा साठा हस्तगत

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या. काल पोलिसांनी संबंधित फ्लॅटवर धडक दिली. तसेच परिसराची झडती घेतली. या कारवाईत पोलिसांना मोठे यश मिळाले असून, आतापर्यंत एकूण पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या मोबाईलच्या तांत्रिक तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी १८ अश्लील व्हिडिओ आणि ३९ आक्षेपार्ह फोटो हस्तगत केले आहेत. यावेळी मुख्य आरोपी अहमद अयानसह ६ जणांना अटक करण्यात आली आहे, तर अन्य ४ संशयितांची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींचे धागेदोरे खूप खोलवर असावेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास कोणत्याही राजकीय किंवा बाह्य दबावाखाली येऊ नये, तसेच तपासाची दिशा भरकटू नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...