AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण, आरोपी अयानचे संतापजनक कृत्य, जन्मदात्या आईसोबत…

परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदने चैनीसाठी आईचे दागिने चोरून विकल्याचे उघड झाले आहे. आज अचलपूर न्यायालयात आरोपींची कोठडी वाढवून मिळवण्यासाठी पोलीस प्रयत्न करणार आहेत.

परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण, आरोपी अयानचे संतापजनक कृत्य, जन्मदात्या आईसोबत...
Ayan Ahmad
| Updated on: Apr 21, 2026 | 7:31 AM
Share

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा या ठिकाणी तरुणींच्या लैंगिक शोषणाने आणि अश्लील व्हिडीओ प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अयान अहमद याच्या वैयक्तिक आयुष्यातील काळी बाजू आता पोलीस तपासात उघड होताना दिसत आहे. केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीच नव्हे, तर आपल्या विकृत गरजा पूर्ण करण्यासाठी त्याने स्वतःच्या कुटुंबालाही सोडले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अयान अहमद याला सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याचे प्रचंड वेड होते. तो महागडे स्मार्टफोन वापरणे, आलिशान हॉटेलमध्ये पार्ट्या करणे आणि मुलींवर हवा तसा पैसे खर्च करायचा. त्याला या सर्व गोष्टींचा छंद होता. काही दिवसांपूर्वी त्याचा एक इन्स्टाग्रामवर व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत त्याच्याकडे भरपूर रोख असल्याचे दिसत आहे. आता याचे मोठे गुपित समोर आले आहे.

इन्स्टाग्राम रिल्समध्ये जो नोटांचा बंडल दाखवून तो श्रीमंतीचा आव आणत असे, तो पैसा त्याने घामातून नव्हे तर चोरीतून मिळवला होता. त्याने आपल्याच आईचे सोन्याचे मंगळसूत्र आणि एक हार गुपचूप चोरून विकला होता. यातून मिळालेल्या पैशांतून तो आपली चैनीची हौस भागवत होता. त्याच्या या जीवनशैलीमुळे अयानवर मोठ्या प्रमाणावर कर्ज झाले होते. हे कर्ज फेडण्यासाठी आणि आपली महागडी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याने गुन्हेगारीचा मार्ग निवडला. तरुणींना जाळ्यात ओढणे, त्यांचे शोषण करणे आणि त्यानंतर अश्लील व्हिडीओच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल करणे, असा त्याचा क्रूर प्लॅन होता.

कोठडीत वाढ करण्याची मागणी

दरम्यान याप्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याचा साथीदार हुजेर खान यांची सात दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे. पोलीस आज दुपारी त्यांना अचलपूर न्यायालयात हजर करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. व्हिडीओ नेमके कुठे आणि कोणाला पाठवले, याचा तांत्रिक तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. या कारणांमुळे पोलीस न्यायालयाकडे आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करणार आहेत.

पीडितांचे मौन

या प्रकरणात अनेक तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची चर्चा परिसरात आहे, मात्र गेल्या आठ दिवसांत केवळ एकच पीडित मुलगी धैर्याने तक्रार देण्यासाठी पुढे आली आहे. समाजात बदनामी होण्याच्या भीतीने इतर पीडिता समोर येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांना पुराव्यांची साखळी जोडण्यात अडचणी येत आहेत. पोलीस प्रशासनाकडून पीडितांना पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत असून त्यांचे नाव गुप्त ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.

Follow Us
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Eknath Shinde | सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांना हे चिन्ह...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई