AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘उद्या गल्लीबोळातल्यांविषयी विचाराल’, म्हणणाऱ्या पवारांना बच्चू कडू यांचा धक्का, वाशिममध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार!

बच्चू कडू यांनी केलेल्या टिप्पणीबाबत पवारांना पत्रकारांनी प्रश्न केला होता. त्यावर बोलताना कोण बच्चू कडू? उद्या तुम्ही गल्लीबोळातल्यांविषयी विचाराल, असं पवार म्हणाले होते. पवारांनी काल टीका केली त्यानंतर राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.

'उद्या गल्लीबोळातल्यांविषयी विचाराल', म्हणणाऱ्या पवारांना बच्चू कडू यांचा धक्का, वाशिममध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार!
Bacchu Kadu and Sharad Pawar
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 27, 2023 | 3:23 PM
Share

स्वप्निल उमप, अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेमध्ये प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला होता. बच्चू कडू यांनी केलेल्या टिप्पणीबाबत पवारांना पत्रकारांनी प्रश्न केला होता. त्यावर बोलताना कोण बच्चू कडू? उद्या तुम्ही गल्लीबोळातल्यांविषयी विचाराल, असं पवार म्हणाले होते. पवारांनी काल टीका केली त्यानंतर राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.

बच्चू कडू यांचा धक्का

वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांच्या कार्यशैलीवर मानोऱ्याचे नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे नाराज होते. नगराध्यक्ष हेमन्द्र ठाकरे आणि 10 राष्ट्रवादीचे आणि भाजपच्या एका नगरसेवकाने थेट बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षात प्रवेश केला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार तालुक्यातील कुरळपूर्णा या ठिकाणी पक्षप्रवेश करण्यात आला.

काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवार यांना बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकरांनी सांगितल्यावर त्यांनी, मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. केंद्रात अनेक वर्षे मोठी जबाबदारी स्कीकारली आहे. तुम्ही कुणीही काही आरोप केले की विचाराल. यावर पत्रकाराने ते चारवेळा आमदार आहेत आणि अपक्ष निवडून आल्याचं सांगितलं. त्यानंतर ते चारवेळा आमदार होते तर मी चारवेळी मुख्यमंत्री होतो, असं सांगितलं.

बच्चू कडू काय म्हणालेले?

राष्ट्रवादी मोठा गेम करत असून पवार काका-पुतणे महाराष्ट्राला वेड्यात काढत आहेत. पवार साहेब जे बोलतात ते करत नाहीत आणि जे बोलत नाहीत ते करतात. शिवसेना फुटल्यानंतर जे घडलं ते इथे काही दिसत नाही. सगळ्यांचा संगम करून ते स्वत: चा सागर तयार करतील, असं बच्चू कडू म्हणाले होते.

दरम्यान, कोण बच्चू कडू असं पवार म्हणाले अन् इकडे वाशिममध्ये पक्षाला खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादीच्या 10 नगरसेवकांसह भाजपच्या एका नगरसेवकाने प्रहार पक्षामध्ये प्रवेश केलाय.  पवारांच्या कालच्या वक्तव्यानंतर नगरसेवकांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Follow Us
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...