AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 : आशिया कपआधी पाकिस्तान संघाला मोठा झटका, जगासमोर ‘ती’ गोष्ट आलीच!

Babar Azam Asia Cup 2023 : बाबर आझम आणि विराट कोहली याची तुलना केली जाते. आशिया कप सुरू व्हायला अवघे तीन दिवस बाकी असून पाकिस्तान संघाची मोठी गोष्ट समोर आलीय.

Asia Cup 2023 : आशिया कपआधी पाकिस्तान संघाला मोठा झटका, जगासमोर 'ती' गोष्ट आलीच!
| Updated on: Aug 27, 2023 | 12:11 PM
Share

मुंबई : आशिया कप 2023 तोंडावर आला असताना पाकिस्तान संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. आशिया कप सुरू व्हायला अवघे तीन दिवस बाकी असून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याची  कमजोरी जगजाहीर झाली आहे. मात्र संघासाठी मोठी चिंतेची बाब असणार आहे कारण पाकिस्तानची फलंदाजी बऱ्यापैकी बाबर आझमवर अवलंबून दिसते. जर सुरूवातील विकेट्स गेल्या तर त्यांचा डाव पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळतो. अफगाणिस्तानच्या दौऱ्यात बाबरची मोठी कमजोरी समोर आली आहे.

काय आहे ती कमजोरी?

बाबर आझमने अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत दोन अर्धशतके केली आहेत. मात्र स्पिनर्सनी त्याला चांगलंच गुंडाळलेलं दिसून आलं. पहिल्या सामन्यामध्ये तर त्याला भोपळाही फोडता आला नाही. मुजीब उर रहमानने त्याला शून्यावर आऊट केलं होतं. तिसऱ्या सामन्यामध्ये बाबर चांगला सेट झाला असताना राशिद खानने त्याला 60 धावांवर आऊट केलं.

फक्त ही मालिकाच नाहीतर त्याच्या आतापर्यंतच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्याला स्पिनर्सचं कोडं काही सोडवता आलं नाही. 101 डावांमध्ये 89 वेळा तो आऊट झाला त्यातील 28 वेळा स्पिनर्सने त्यालाआपला बकरा बनवलं आहे. गेल्या दोन वर्षांची त्याची आकडेवारी पाहिलीत तर त्याला 11 वेळा स्पिनर्सने आऊट केलं आहे. 2022 पासून आतापर्यंत 20 सामने खेळले आहेत त्यातील 11 वेळा त्याला स्पिनर्सने आऊट केलंय.

बाबर आझम आणि विराट कोहली याची तुलना केली जाते. दोघांमध्ये ही गोष्ट दिसून आली आहे की, दोघेही आता स्पिनर्सच्या जाळ्यात सहजपणे अडकताना दिसत आहेत. फक्त फरक इतकाच आहे की कोहलील डाव्या तर बाबरला उजव्या हताच्या स्पिनर्सने आऊट केलं आहे.

दरम्यान, आता आशिया कप आणि त्यानंतर वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धा आहेत. यामध्ये दोघांकडून त्यांच्या संघाला  सर्वाधिक अपेक्षा असणार आहेत. कोहलीचा हा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. वर्ल्ड कप भारतामध्ये होणार असल्याने टीम इंडियाला इतिहास रचण्याची मोठी संधी आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.