भगवं उपरणं, काळा ड्रेस, जय श्रीरामचा गजर, धडाक्यात बुलेट स्वारी, नवनीत राणांचा Video, सोशल मीडियात चर्चाच चर्चा

| Updated on: Mar 30, 2023 | 11:23 AM

रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त खासदार नवनीत राणा यांनी राज्यातील जनतेला अनोख्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत. नवनीत राणा यांचा हा खास व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

भगवं उपरणं, काळा ड्रेस, जय श्रीरामचा गजर, धडाक्यात बुलेट स्वारी, नवनीत राणांचा Video, सोशल मीडियात चर्चाच चर्चा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

स्वप्निल उमप, अमरावती: आज रामनवमी (Ramnavami) निमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा एक Video तुफान व्हायरल होतोय. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या नवनीत राणा यांनी राज्यातील जनतेला अनोख्या प्रकारे शुभेच्छा दिल्या. आज सकाळीपासूनच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतोय. नवनीत राणा यांनी डोक्याला भगवा गमछा तथा उपरणं बांधलंय. काळा पंजाबी ड्रेस परिधान करून त्यांनी बुलेट स्वारी केलीय. ना हार की फिकर करते है, ना जित का जिकर करते है.. जय श्रीराम असे म्हणत नवनीत राणा यांनी बुलेटस्वारीला सुरुवात केली. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानी प्रसिद्धी झोतात असलेल्या नवनीत राणा यांचा हा आणखी एक व्हिडिओ आता चर्चेत आलाय.

डोक्याला भगवं उपरणं…

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राम नवमीनिमित्त रामभक्तांना तसेच राज्यातील तमाम जनतेला विशेष शुभेच्छा दिल्यात.या व्हिडिओत एका निर्जन रस्त्यावर नवनीत राणा यांनी ही बुलेटस्वारी केली आहे. आधी राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या तर त्यांनंतर खास स्टाइलमध्ये त्यांनी बुलेटस्वारी केली. पूर्वाश्रमीची लोकप्रिय असलेल्या नवनीत राणांनी या व्हिडिओत आपल्या अभिनयाची एक सुंदर झलक दाखवून दिली आहे. डोक्याला भगवं उपकरण आणि काळा ड्रेस परिधान केल्याने नवनीत राणा यांचा हा लूक विशेष उठून दिसतोय.

हनुमान जयंतीला भव्य कार्यक्रम

येत्या ६ एप्रिल रोजी हनुमान जयंती आणि नवनीत राणा यांचा वाढदिवस यानिमित्त अमरावतीत भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. अमरावतीत येत्या काही दिवसात १११ फुट उंचीची भव्य हनुमान मूर्ती विराजित केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम या दिवशी केला जाईल. यावेळी नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यामार्फत सामुहिक हनुमान चालिसा पठनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हिंदू शेरनी…

महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालिसा पठनासाठी केलेलं आंदोलन, याविरोधात त्यांच्याविरोधात दाखल झालेला देशद्रोहाचा गुन्हा आणि १४ दिवसांचा तुरुंगवास या सर्व घटनाक्रमाचे फोटो असलेले भव्य बॅनर अमरावती तसेच मुंबईतही झळकवण्यात आले आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्यासाठी हे बॅनर्स झळकवण्यात आलेत. यावर नवनीत राणा यांचा उल्लेख हिंदू शेरनी असा करण्यात आलाय.