AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरपंचासोबत उपसरपंच अडकले विवाहबंधनात, भन्नाट लव्हस्टोरी मुक्कामपोस्ट ग्रामपंचायत

अमरावतीत सरपंच आणि उपसरपंच (Sarpanch) यांनीच लगीनगाठ बांधल्याने सध्या याच लव्ह स्टोरीची हवा आहे. गावचा कारभार संभाळताना हा संसाराचा गाडा साधारण एक वर्षापूर्वीच त्यांच्यासाठी सुरू झालाय.

सरपंचासोबत उपसरपंच अडकले विवाहबंधनात, भन्नाट लव्हस्टोरी मुक्कामपोस्ट ग्रामपंचायत
ग्राम पंचायतीतील लव्हस्टोरी
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Feb 19, 2022 | 10:04 PM
Share

अमरावती : आजपर्यंत तुम्ही अनेक लव्हस्टोरी (Love Story) पाहिल्या असतील, वाचल्या असतील मात्र अमरावतीतली ही भन्नाट लव्हस्टोरी एकदा वाचाच. त्याच झालं असं अमरावतीत सरपंच आणि उपसरपंच (Sarpanch) यांनीच लगीनगाठ बांधल्याने सध्या याच लव्ह स्टोरीची हवा आहे. गावचा कारभार संभाळताना हा संसाराचा गाडा साधारण एक वर्षापूर्वीच त्यांच्यासाठी सुरू झालाय. तसं गावगाड्याचं राजकारण फार अवघड असतंय. मात्र आयुष्याच्या वाटेवर सरपंच आणि उपसरपंचांची कायमची युती झाल्याने ही वयक्तिक ग्रामपंचायत (Grampanchayat) पाच वर्षांनी बरखास्त होणार नाही, एवढं मात्र नक्की. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर पंचायत समिती अंतर्गत कांडली ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच आज 19 फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले आहेत. या भागात या लग्नाची एवढी चर्चा आहे की, आजच्या फरहान आणि शिबानीच्या लग्नाचीही नसेल.

गावगाड्याबरोबर संसाराचा गाडा

गावचा गाडा हाकताना संसाराचा गाडा सुरू होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असले. पण ही कायमची युती झाली कशी याची स्टोरीही तेवढीच इंटरेस्टिंग आहे. गेल्या एक वर्षापासून ते कांडली ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच मिळून एकत्रित काम करीत आहेत. विवाह बंधनाच्या निर्णयाने कांडली ग्रामपंचायतवर पती-पत्नीची एकहाती सत्ता कांडलीवासीयांसह तालुक्याला बघायला मिळणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर सरपंच आणि उपसरपंच बनणे. वर्षभर एकत्रित काम करणे. नंतर विवाह बंधनात अडकून परत एकहाती सत्ता ग्रामपंचायतीवर गाजविणारे हे भावी दाम्पत्य अमरावती जिल्ह्यातील पहिले दाम्पत्य ठरले आहे.

धाडसी निर्णयामुळे जोडपं चर्चेत

कांडली ग्रामपंचायत निवडणुकीत सविता आहाके आणि दिलीप धंडारे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. 2020-21 मध्ये सविता आहाके सरपंचपदी तर दिलीप धंडारे उपसरपंचपदी विराजमान झाले आहेत. दरम्यान, त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. ग्रामपंचायत क्षेत्रातून दारूची दुकाने, गॅस गोडाऊन हद्दपार करणे, वीज वितरण कंपनीवर कर आकारणे यासाठी सरपंच, उपसरपंचाची जोडी तालुक्यात चर्चेत राहिली. विवाहाप्रीत्यर्थ निमंत्रण पत्रिकेवर त्यांनी शिवाजी महाराजांना मानाचे स्थान दिले आहे. शिवजयंतीदिनी हा विवाह संपन्न झाला आहे. त्यामुळे या अनोख्या राजकीय लव्ह स्टोरीची सध्या जोरदार चर्चा आहे.

संदीप क्षीरसागरांच्या ” मैं झुकेगा नही” नंतर योगेश क्षीरसागर यांचे ‘मैं हूं डॉन’; चर्चा फक्त बीडच्या राजकारणाची

फडणवीस म्हणतात महाराजांचे कार्यक्रम अडवणाऱ्यांना महाराजच शिक्षा करतील, कुणी अडवले कार्यक्रम?

सोमय्या-राऊत वादावर बोलणार नाही, मी लहान कार्यकर्ता, मुश्रीफांचा कुणाला टोला?

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?