संदीप क्षीरसागरांच्या ” मैं झुकेगा नही” नंतर योगेश क्षीरसागर यांचे ‘मैं हूं डॉन’; चर्चा फक्त बीडच्या राजकारणाची

बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar) यांनी एका भाषणात पुष्पा चित्रपटातील " मैं झुकेगा नही" हा डायलॉग बोलून दाखविल्यानंतर त्याची राज्यभरात चर्चा झाली होती. आता संदीप यांचेच सख्खे चुलतभाऊ शिवसेना नेते योगेश क्षीरसागर (Yogesh Kshirsagar) यांनी मैं हूं डॉन हे गाणे गाऊन त्यांना डिवचले आहे.

संदीप क्षीरसागरांच्या  मैं झुकेगा नही नंतर योगेश क्षीरसागर यांचे 'मैं हूं डॉन'; चर्चा फक्त बीडच्या राजकारणाची
योगेश क्षीरसागर
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 9:29 PM

बीड : बीडमधील (Beed) राजकारणाची राज्यभरात चर्चा होत असते. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भाऊ, बहिणीमुळे बीड जिल्ह्याचे राज्याच्या राजकारणात चांगलेच वजन आहे. मात्र आता यामध्ये बीडचे  क्षीरसागर घराने देखील मागे नसल्याचे पहायला मिळत आहे. बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar) यांनी एका भाषणात पुष्पा चित्रपटातील ” मैं झुकेगा नही” हा डायलॉग बोलून दाखविल्यानंतर त्याची राज्यभरात चर्चा झाली होती. आता संदीप यांचेच सख्खे चुलतभाऊ शिवसेना नेते योगेश क्षीरसागर (Yogesh Kshirsagar) यांनी मैं हूं डॉन हे गाणे गाऊन त्यांना डिवचले आहे. एरवी काका- पुतणे यांचा वाद जगजाहीर असताना आता सख्खे चुलतभाऊ आमनेसामने आल्याने बीडचे राजकारण तापले आहे. योगेश क्षीरसागर यांनी गायलेले हे गाने आता चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे यावेळी माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांची देखील स्टेजवर उपस्थिती होती.

काका पुतण्यात वाद

बीडच्या राजकारणात काका पुतण्यात सुरू असलेला वाद सर्व परिचित आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर यांनी आपले काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला होता. तेव्हापासून क्षीरसागर कुटुंबात दोन गट पडले आहेत. त्याचीच झलक पुन्हा एकदा बीडकरांना पाहिला मिळाली. बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी एका भाषणात पुष्पा चित्रपटातील ” मैं झुकेगा नही” हा डायलॉग बोलून दाखविल्यानंतर त्याची राज्यभरात चर्चा झाली होती. आता संदीप यांचेच सख्खे चुलतभाऊ शिवसेना नेते योगेश क्षीरसागर यांनी मैं हूं डॉन हे गाणे गाऊन त्यांना डिवचले आहे.

वादात एमआएमची उडी

दरम्यान दुसरीकडे क्षीरसागर बंधुंच्या या वादात  एमआयएमने उडी घेतल्याचे पहायला मिळाले. पुष्पाला जंगलात पाठवू आणि डॉनला हद्दपार करू, बीड मध्ये जंगलराज आहे का असा टोला एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शफिक शेख यांनी लगावला आहे. त्यामुळे आता एमआयएमच्या या टीकेला राष्ट्रवादी काय प्रत्युत्तर देणार हे पहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Video | दत्ता भरणे पुन्हा चर्चेत; वरातीत धरला ठेका

फडणवीस म्हणतात महाराजांचे कार्यक्रम अडवणाऱ्यांना महाराजच शिक्षा करतील, कुणी अडवले कार्यक्रम?

सोमय्या-राऊत वादावर बोलणार नाही, मी लहान कार्यकर्ता, मुश्रीफांचा कुणाला टोला?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.