AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरच्या तरुणांचा अमरावतीत फिल्मी थरार! डोक्यावर बंदूक ठेवून हवेत गोळीबार, कशासाठी तर…

प्रियकराने तरुणीच्या नातेवाईकापैकी एकाच्या डोक्याला बंदूक लावली. जीवे मारण्याची धमकी देत हवेत गोळीबार करून दहशत पसरवली. या संपूर्ण प्रकाराने तरुणीचे नातेवाईक चांगलेच घाबरले होते.

नागपूरच्या तरुणांचा अमरावतीत फिल्मी थरार! डोक्यावर बंदूक ठेवून हवेत गोळीबार, कशासाठी तर...
राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत गोळीबाराची घटना घडलीImage Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 08, 2022 | 11:51 AM
Share

स्वप्निल उमप

अमरावती : एखाद्या तरुणीच्या लग्नाला तिच्या घरच्याकडून विरोध होतो. प्रेमाच्या अथांग सागरात बुडालेला प्रियकर आपल्या जीवाची बाजी लावतो. आपल्या प्रेयसीला मिळवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतो. अनेकदा प्रियकर प्रेयसीच्या घरच्यांना धमक्या, मारझोड करताचे चित्र आपण पाहतो. पण ते प्रत्यक्षात नाही तर चित्रपटात… परंतु, असाच धक्कादायक आणि चित्रपटातील एखाद्या घटनेला शोभेल असाच प्रकार अमरावतीमध्ये रात्री बाराच्या सुमारास घडला. प्रेयसीला फूस लावून पळवून नेण्यासाठी नागपूरमधील एका प्रियकराने (a lover in Nagpur) चक्क तरुणीच्या नातेवाईकाच्या डोक्याला बंदूक लावली. हवेत गोळीबार करून प्रेयसीला प्रियकर पळून घेऊन गेला. ही फिल्मी स्टाईल घटना अमरावतीत मध्यरात्री (night in Amravati) घडल्याने खळबळ उडाली. या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी अटक (police arrested the accused) केली. आणखी दोन आरोपी फरार आहेत.

काय आहे प्रकरण ?

नागपूरमधील एक तरुणी घरगुती कार्यक्रमासाठी अमरावती शहरातील बालाजी प्लॉटमधील आपल्या नातेवाईकांकडे आली होती. काल रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास सर्व कुटुंबीय जेवन करून बसले होते. तेवढ्यात आरोपी प्रियकर हा अन्य साथीदारासोबत दुचाकी घेऊन तरुणीच्या नातेवाईकांच्या घराजवळ पोहचला. यावेळी त्याने त्याच्या प्रेयसीला सोबत येण्याची गळ घातली होती. पण त्या तरुणीचे नातेवाईक त्याला विरोध करत होते. यावेळी आरोपी प्रियकराने तरुणीच्या नातेवाईकापैकी एकाच्या डोक्याला बंदूक लावली. जीवे मारण्याची धमकी देत हवेत गोळीबार करून दहशत पसरवली. या संपूर्ण प्रकाराने तरुणीचे नातेवाईक चांगलेच घाबरले होते. याचाच फायदा घेत आरोपी प्रियकर व त्यांच्या साथीदारांनी प्रेयसीला सोबत घेऊन नागपूरकडे पळवून नेले.

प्रियकर, प्रेयसी पळाले

बालाजी प्लॉटमध्ये रात्री ही फिल्मी स्टाईल घटना घडली. त्यानंतर लागलीच तरुणीच्या नातेवाईकांनी पोलिसांना संपर्क केला. यावेळी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी व त्यांच्या साथीदारांचा पाठलाग केला. यावेळी पोलिसांनी नांदगाव टोल नाका परिसरातून आरोपी साथीदार प्रफुल दामाये व रमेश अतपाका (रा. नागपूर) यांना अटक केली. आरोपी प्रियकर व त्या तरुणीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे

अमरावती शहरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. हवेत गोळीबार करणारा आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती तरुणीच्या नातेवाइकांनी दिली. या पूर्वीही त्याच्यावर नागपूरमध्ये गुन्हा दाखल असल्याची माहितीही तरुणीच्या नातेवाईकांनी दिली. राजापेठ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Video – अमरावतीत महिला पोलिसांचे झुंबा नृत्य, फेटे परिधान करून घेतला सहभाग

राज्य युवक काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक, कुणाल राऊत यांना सर्वाधिक मते, कोण आहेत कुणाल राऊत?

Nagpur ZP | च्यमनप्राश नाही आता बिटकॉझिंकच्या गोळ्या! कुपोषित, किशोरवयीन, गरोदर मातांचे आरोग्य सुधारणार

Follow Us
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या दानवेंच
जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या अंबादास दानवेंचा विजय की पराभव?
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदी
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदीचा धडकी भरवणारा Video
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्या
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये पोहोचवली मदत
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरे
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरेंवर... नेमकं काय म्हणाली?