Video – अमरावतीत महिला पोलिसांचे झुंबा नृत्य, फेटे परिधान करून घेतला सहभाग

अमरावती महिला पोलिसांसाठी महिला दिनानिमित्त झुंबा नृत्याचे आयोजन केले होते. यावेळी महिला पोलिसांनी फेटे परिधान केले होते. अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Video - अमरावतीत महिला पोलिसांचे झुंबा नृत्य, फेटे परिधान करून घेतला सहभाग
अमरावती महिला पोलीस झुंबा नृत्य करताना. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 11:12 AM

स्वप्निल उमप

अमरावती : वर्षभर महिला पोलीस अधिकारी (Women Police Officer) आणि महिला पोलीस कर्मचारी या आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून पोलीस खात्यात कर्तव्य बजावत असतात. परंतु जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचारी यांच्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. अमरावतीमध्येही जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने डॉ. आरती सिंह (Dr. Aarti Singh), पोलीस आयुक्त अमरावती शहर तसेच रोटरी ग्रुप ऑफ अमरावती अंबानगरी आणि शिवाजी कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अमरावती यांच्या सहभागाने महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या झुंबा नृत्याचे ( Jhumba dance) आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला पोलिसांनी मनसोक्तपणे या नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी सर्व महिला पोलिसांनी फेटे परिधान करून या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

पाहा व्हिडीओ

महिलांनी काढली बाईक रॅली

जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने महिला सशक्तीकरण जनजागृती करण्याकरिता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, तसेच रोटरी ग्रुप ऑफ अमरावती अंबानगरी आणि शिवाजी कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अमरावती यांच्या सहभागाने ही रॅली काढण्यात आली. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास या रॅलीला पोलीस आयुक्तालयाच्या मैदानातून आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी हिरवी झेंडी दाखवली. त्यानंतर ही रॅली बियाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचवटी चौक, इर्विन चौकासह इतर चौकातून या रॅलीने मार्गक्रमण केले. महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रॅलीने अमरावती करांचे लक्ष वेधून घेतले होते.

राज्य युवक काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक, कुणाल राऊत यांना सर्वाधिक मते, कोण आहेत कुणाल राऊत?

भंडाऱ्यातील शेकडो बालकांचे केले संगोपन, महिला नव्हे ज्ञानाचं विद्यापीठचं! कमलाबाईंनी जोपासली भजनाचीही आवड

Nagpur ZP | च्यमनप्राश नाही आता बिटकॉझिंकच्या गोळ्या! कुपोषित, किशोरवयीन, गरोदर मातांचे आरोग्य सुधारणार

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.