Amravati water scarcity | अमरावतीतील मेळघाटात भीषण पाणीटंचाई, 2 किमीची पाण्यासाठी पायपीट, असा करावा लागतो जुगाड

| Updated on: May 12, 2022 | 11:45 AM

पाणीटंचाई असल्याने गावात दररोज दोनवेळा पाण्याचा टँकर येतो. टँकरमधून पाणी विहिरीत सोडलं जातं. गावाबाहेर असलेल्या विहिरीत पाणी सोडल्यानंतर नागरिक तेथून पाणी आणतात. तरीदेखील पुरेसं पाणी गावकऱ्यांना मिळत नाही.

Amravati water scarcity | अमरावतीतील मेळघाटात भीषण पाणीटंचाई, 2 किमीची पाण्यासाठी पायपीट, असा करावा लागतो जुगाड
अमरावतीतील मेळघाटात भीषण पाणीटंचाई
Image Credit source: t v 9
Follow us on

अमरावती : उन्हाळ्यात विदर्भात सर्वाधिक उन्हाचा तडाखा असतो. यंदा उन्हाचा पारा 44 अंश सेल्सिअस गेल्याची नोंद आहे. उन्हाचा पारा वाढला की विदर्भात अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवते. अमरावतीच्या मेळघाटात यावेळी होणारा पाऊस झाला तरी, पाणीटंचाईची दाहकता कायम असल्याचं दिसत आहे. चिखलदरा तालुक्यातील मोथा गावात दरवर्षी भीषण पाणीटंचाई असते. यंदा सुद्धा या गावात पाणीटंचाई दिसते आहे. नागरिकांना गावाबाहेरील विहिरीवरून पाणी आणावं लागत आहे. चिखलदरा तालुक्यातील मोथा (Motha in Chikhaldara taluka) गाव. 4500 फूट उंचावर सातपुडा पर्वतात (Satpuda mountains) वसलेलं मोथा गाव. यंदा या गावात पाणीटंचाईचं भीषण सावट आहे. येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी (for drinking water) पायपीट करावी लागते आहे.

चिखलदरा तालुक्यात 10 टँकरने पाणीपुरवठा

पाणीटंचाई असल्याने गावात दररोज दोनवेळा पाण्याचा टँकर येतो. टँकरमधून पाणी विहिरीत सोडलं जातं. गावाबाहेर असलेल्या विहिरीत पाणी सोडल्यानंतर नागरिक तेथून पाणी आणतात. तरीदेखील पुरेसं पाणी गावकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे कायमची पाण्याची उपाययोजना करावी अशी विनवणी गावकरी करतात. काहींना पाणी मिळत तर काहींना पाण्याअभावी परताव लागतं. या गावातील नागरिक रोजगार सोडून दिवसभर पाण्याच्या शोधात असतात. त्यामुळे त्यांचा रोजगार देखील बुडत असल्याचं गावकरी सांगतात. सद्या जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेता विविध उपाययोजना केल्या जात आहे. एकट्या मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यात 10 टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा पाणी पुरवठा अधिकारी राजेंद्र सावळकर यांनी दिली आहे.

तिवसा नगरपंचायत कार्यालयात दोन तास ठिय्या

अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 14 येथे गेल्या बारा दिवसांपासून घरगुती नळाला पाणीच आले नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी तिवसा नगरपंचायत कार्यालयात दोनतास ठिय्या आंदोलन करून प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविषयी रोष व्यक्त केला. निवडणुका येताच शहराच्या पाणी समस्यावरून विरोधक व सत्ताधारी एकमेकांवर ताशेरे ओढतात. मात्र पाणी समस्येवर काहीच केल्या जात नसल्याचा आरोप करत शेकडो महिलांनी नगरपंचायतला धडक देत कार्यालयात घागर फोडून प्रशासनाचा निषेध केला. दोन तास ठिय्या देत पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अश्या घोषणा यावेळी महिलांनी दिल्या.

हे सुद्धा वाचा