AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हादरवणारा खुलासा… फक्त रुपाली चाकणकर याच नाही तर भोंदू खरात याच्यासोबत संपूर्ण..

अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. यादरम्यानच आता अंजली दमानिया यांनी झोप उडवणारा खुलासा केला. अंजली दमानिया यांनी थेट राज्यातील महत्वाच्या नेत्यांची नावे घेत काही धक्कादायक दावे केली.

हादरवणारा खुलासा... फक्त रुपाली चाकणकर याच नाही तर भोंदू खरात याच्यासोबत संपूर्ण..
Rupali Chakankar Ashok Kharat
| Updated on: Apr 15, 2026 | 1:54 PM
Share

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. अशोक खरात याचे हैराण करणारे व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. यादरम्यानच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठे गाैप्यस्फोट केले आहेत. अंजली दमानिया यांनी म्हटले की, खरातचा मोबाईल बंद होऊपर्यंत रुपाली चाकणकर यांचे कॉल सुरू होते. फक्त हेच नाही तर जयंत पाटील यांचेही फोन खरातला येत होते. चाकणकर या खरातला कॉल करणाऱ्या टॉप 2 कशा आहेत, हा देखील मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पुढे आली. काही व्हिडीओमध्ये तर रुपाली चाकणकर या चक्क अशोक खरात याचे पाय धुताना दिसल्या. या प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांना थेटपणे महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.

नुकताच बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटले की, फक्त रुपाली चाकणकर याच नाही तर त्यांच्या कुटुंबातील अनेकजण अशोक खरात याच्या संपर्कात होते. लोक उठता बसता खरातला फोन करायचे. प्रतिमा चाकणकर यांनी म्हटले की, आम्हाला कोणी चाैकशीसाठी बोलावले नव्हते. या प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांना लगेचच एसआयटीने चाैकशीला बोलावणे अपेक्षित होते.

हेच नाही तर अंजली दमानिया यांनी म्हटले की, रुपाली चाकणकर यांनी पुढे येऊन आपली बाजू मांडावी. प्रतिमा चाकणकर थेटपणे खोटे बोलत आहेत. त्यांनी म्हटले की, चाैकशीसाठी आम्हाला नोटीस आली नाही. पण त्या खोटे बोलत आहेत, त्यांना चाैकशीसाठी बोलावण्यात आले होते. सगळी लोक धांदात खोटे बोलत आहेत.

दीपक केसरकर आणि खरात यांच्यात 19 कॉल झाल्याचे मोठे विधान अंजली दमानिया यांनी केले. यादरम्यानच त्यांनी काही फोटोही दाखवली. चाकणकर यांना चाैकशीसाठी का बोलवले जात नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. टॉप 10 फोन नंबर आहे. जास्तवेळ खरातांशी बोलले. त्यात खरातची मुलगी पहिल्या नंबरवर आहे. समजू शकते. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...