दहा दिवसांत मंदिरं उघडा, अन्यथा…, अण्णा हजारेंचे राज्य सरकारला अल्टिमेटम

| Updated on: Aug 29, 2021 | 12:46 AM

रोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे मंदिरं उघडण्यात यावीत ही मागणी जोर धरु लागलीय. विरोधी पक्षाचे नेते मागील अनेक दिवसांपासून ही मागणी करत आहेत. आता यामध्ये समाजसेवक अण्णा हजारे यांनी उडी घेतली आहे.

दहा दिवसांत मंदिरं उघडा, अन्यथा..., अण्णा हजारेंचे राज्य सरकारला अल्टिमेटम
ANNA-HAJARE
Follow us on

अहमदनगर : कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून राज्यात सर्व मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. मात्र, याच निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी दंड थोपटले आहेत. त्यांनी लवकरात लवकर मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे. तसेच सरकार मंदिरं उघडणार नसेल तर आगामी काळात तीव्र आंदोलन छेडावे, मी तुमच्या सोबत आहे, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. (Anna Hazare demands state government to open temples within ten days)

दारूची दुकाने, हॉटेलमध्ये कोरोना पसरत नाही का ?

राज्यातील मंदिरांमध्ये गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे राज्य सरकारने सर्व मंदिरं बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे मंदिरं उघडण्यात यावीत ही मागणी जोर धरु लागलीय. विरोधी पक्षाचे नेते मागील अनेक दिवसांपासून ही मागणी करत आहेत. आता यामध्ये समाजसेवक अण्णा हजारे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी राज्यातील मंदिरं उघडण्यात यावेत अशी जाहीर मागणी केली आहे. तसेच राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे. राज्यात दारूची दुकाने, हॉटेल सर्व सुरु आहेत. या ठिकाणीसुद्धा गर्दी होते. मग येथे कोरोना पसरत नाही का ? असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.

…तर मोठे आंदोलन करा

तसेच मंदिरामधून सात्विक विचार मिळतात. अशा ठिकाणांना बंद करून सरकारने काय मिळवले ? आगामी 10 दिवसांत सरकारने मंदिरं अघडण्याचा निर्णय घेतला नाही तर मोठे आंदोलन करा. मी तुमच्या सोबत आहे, असे आवाहन हजारे यांनी जनतेला केले आहे.

दरम्यान, अण्णा हजारे यांच्या या इशाऱ्यानंतर राज्य सरकार मंदिरांबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला 10 दिवसांची मुदत दिलेली आहे.

इतर बातम्या :

Karnal Farmer Protest : ‘इथं कुणीही आलं तर सरळ डोकं फोडा!’ एसडीएमचा व्हिडीओ व्हायरल, शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप

Video : अजितदादांनी इलेक्ट्रिक रिक्षा चालवली, रोहित पवारांनी टेम्पोचं स्टेअरिंग हाती घेतलं!

Video : राणेंच्या ताफ्यासमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी, राणेंनीही गाडी थांबवत शिवसैनिकांवर नजर रोखली!

(Anna Hazare demands state government to open temples within ten days)