जुनी मालमत्ता घेतांना वीजमीटर नावावर करण्याची चिंता मिटली, महावितरणचा इज ऑफ लिव्हिंग…

| Updated on: Dec 03, 2022 | 8:44 AM

पूर्वी वीज कनेक्शनला नाव लावण्यासाठी महावितरण कंपनीकडे अनेकदा पाठपुरावा करावा लागत होता, ऑनलाइन सुविधाही अनेकदा अडचणीची ठरत होती.

जुनी मालमत्ता घेतांना वीजमीटर नावावर करण्याची चिंता मिटली, महावितरणचा  इज ऑफ लिव्हिंग...
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : जुनी कुठलीही मालमत्ता खरेदी केल्यानंतर वीज मीटर नावावर करण्याची कटकट आता बंद होणार आहे. महावितरण कंपनीने त्यासाठी खास उपक्रम सुरू केला आहे. नुकतीच त्याची प्रायोगिक तत्वावर चाचणी करण्यात आली असून ती यशस्वी देखील झाली आहे. राज्यभरातील काही महत्वाच्या शहरांमध्ये ही चाचणी करण्यात आली होती. ज्यावेळी जुने घर, दुकान किंवा इतर कुठलीही मालमत्ता खरेदी केल्यानंतर विजेचे कनेक्शन मूळ मालकाच्या नावावरून नव्या मालकाच्या नावावर करण्याची प्रक्रिया खूपच किचकट होती. त्यात महावितरण कार्यालयाची उंबरठे झिजवावे लागत होते. तरी देखील त्रुटि असल्याने अनेकदा वीज मीटर नावावर होत नव्हते, त्यात नंतर ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली. त्यामध्ये प्रक्रिया फी आणि कागदपत्रे अपलोड केली की वीज कनेक्शन नावावर होण्यास अडचण येत नव्हती. परंतु त्याचा अनेकदा ऑनलाईन कामासाठी पाठपुरावा करावा लागत होता. त्यामुळे ही प्रक्रियाही नागरिकांसाठी अडचणीची ठरत होती.

महावितरण कंपनीने इज ऑफ लिव्हिंग हा उपक्रम सुरू केला आहे, त्यानुसार आता जून घर, दुकान किंवा कुठलीही मालमत्ता नावावर केल्यानंतर महिनाभरातच नवीन मालमत्ताधारकाचे नाव लागणार आहे.

पूर्वी वीज कनेक्शनला नाव लावण्यासाठी महावितरण कंपनीकडे अनेकदा पाठपुरावा करावा लागत होता, ऑनलाइन सुविधाही अनेकदा अडचणीची ठरत होती.

हे सुद्धा वाचा

मात्र, ही कटकटच महावितरण कंपनीने बंद करून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे, ज्यामुळे महिनाभरात नवीन व्यक्तीचे नाव लागणार आहे.

मालमत्ता खरेदी केल्यानंतर महावितरण कंपनीकडून एसएमएस येणार आहे, त्यावर पुढील प्रक्रिया करून ऑनलाईन रक्कम भरता येणार आहे, त्यांनंतर एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या नावावर मालमत्ता असेल तर त्यावर पर्याय निवडण्याची संधी असणार आहे.

ग्राहकांना आता वीज कनेक्शन आपोपापच बदलून मिळणार असून ऑक्टोबर महिन्यात ही प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून लवकरच कार्यान्वित होणार आहे.