AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Sutar : दगडांना जिवंत करणारा अवलिया शिल्पकार… एक होते राम सुतार !

प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या निधनाने कलाविश्व पोरके झाले आहे. आपल्या शिल्पात जीव ओतणारे आणि हुबेहूब जिवंत मूर्ती घडवणारे राम सुतार हे 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'सह शेकडो महात्मा गांधींचे पुतळे, ऐतिहासिक स्मारके व कलाकृतींचे निर्माते होते. पद्मश्री, पद्मभूषण आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी सन्मानित, त्यांचे कार्य भारतीय शिल्पकलेतील एक अविस्मरणीय अध्याय आहे.

Ram Sutar : दगडांना जिवंत करणारा अवलिया शिल्पकार... एक होते राम सुतार !
दगडांना बोलतं करणारा शिल्पकार...Image Credit source: social media
| Updated on: Dec 18, 2025 | 11:22 AM
Share

फक्त मातीच्या गोळ्याला आकार देणं किंवा दगड फोडून त्यातून शिल्प निर्माण करणं इथपर्यंत त्यांचं शिल्प मर्यादित नव्हतं. ते आपल्या शिल्पात जीव ओतायचे. जिवंत व्यक्तीच समोर उभी राहिली की काय असं वाटावं इतकी हुबेहुब जिवंत मूर्ती ते घडवायचे… त्यांच्या हातात जादू होती… आज ही जादू काळाच्या पडद्याआड गडप झाली आहे. प्रसिद्ध शिल्पकार आणि महाराष्ट्र भूषण राम सुतार (Ram Sutar) यांनी जगाचा निरोप घेतला. सुतार यांच्या जाण्याने मूर्ती जिवंत करणारा आवलिया कलावंत गेला. कलाविश्व पोरके झाले. धुळ्यातून सुरू झालेला हा प्रवास अखेर थांबला… कोण होते राम सुतार ? कसे घडले? धुळ्यातून सुरू झालेल्या या प्रवासाची कहाणी अशी…

101 वर्षांचे राम सुतार हे शिल्पकलेतील भीष्माचार्य म्हणून ओळखले जायचे, याच वर्षी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हसते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हेही उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राम सुतार यांच्या कलाविश्वातील उल्लेखनीय योगदानाचे कौतुक केले.

महाराष्ट्रात झाला जन्म

यावर्षी फेब्रुवारीत राम सुतार यांनी वयाची 100 वर्ष पूर्ण केली. 19 फेब्रुवारी 1915 साली महाराष्ट्रातील गोंडूर गावात एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. नोएडा येथे त्यांनी त्यांचा स्टुडिओ साकारला. 1990 सालापासून ते तेथेच रहात होते. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते राम सुतार यांनी असंख्य ऐतिहासिक शिल्पे आणि स्मारके निर्माण केली. महात्मा गांधींचे साडेतीनशेहून अधिक पुतळे त्यांच्या हाताने तयार झाले. एवढंच नव्हे तर अजिंठा-वेरूळ लेण्यांमधील अनेक प्राचीन शिल्पांच्या जीर्णोद्धारातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित, 450 शहरांमध्येगांधीजींचे पुतळे

199 साली शिल्पकार राम सुतार यांना पद्मश्री, 2018 साली पद्मभूषण तर त्याच वर्षी त्यांना टागोर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. राम सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ( सरदार पटेल यांचा गुजरातमधील पुतळा), महात्मा गांधीचे हुबेहूब पुतळे ( भारतीयस संसदेसह 450 शहरांत) उभारले तसेच त्यांनी अनेक प्रसिद्ध मूर्तीही आपल्या हाताने घडवल्या.

जगातील सर्वात उंच पुतळ्याचे शिल्पकार

– राम सुतार यांनी गुजरातमधील सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच (182 मीटर) पुतळा, स्टॅच्यू ऑफ युनिटी डिझाइन केला.

– संसद भवनासाठी महात्मा गांधींचा पुतळा त्यांच्या हस्ते तयार करण्यात आला आणि अशाच प्रकारचे (त्यांनी केलेले) पुतळे विविध देशांना दान करण्यात आले.

– अयोध्या येथील लता मंगेशकर चौक येथे भगवान श्री राम यांची 251 मीटर उंच मूर्ती आणि वीणा बसवण्यात आली तीही राम सुतार यांनीच घडवली होती.

– 153 फूट उंच भगवान शिव मूर्ती (बंगळुरू)

– छत्रपती संभाजी महाराज यांचा 100 फूट उंच पुतळा (मोशी, पुणे)

– पाटणा येथील गांधी मैदानावर दोन मुलांसह गांधीजींचा पुतळा , तोही त्यांनीच साकारला.

त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.