Manikrao Kokate : कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी 2 वर्षांची शिक्षा?
सदनिका गैरव्यवहार प्रकरणात मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यांना नाशिक सत्र न्यायालयाने 1995 च्या घोटाळ्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात दाखल असून, अटकेनंतर त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद रद्द होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेच्या स्थगितीसाठीच्या अर्जावर तातडीची सुनावणी नाकारली आहे.
सदनिका गैरव्यवहार प्रकरणात मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असून, अटक झाल्यास त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद रद्द होऊ शकते. 1995 सालच्या सदनिका घोटाळ्यात नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटेंना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने त्यांच्या तातडीच्या अटकेचे आदेश दिले असून, “कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही” असे नमूद केले आहे.
दरम्यान, माणिकराव कोकाटे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यांनी आपल्या शिक्षेच्या स्थगितीसाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता, मात्र त्यांनी अटकेपासून संरक्षण मागितले नव्हते. उच्च न्यायालयाने या अर्जावर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. आता या प्रकरणात शुक्रवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणामुळे कोकाटे यांच्यावर अटकेची आणि आमदारकी जाण्याची टांगती तलवार आहे.
चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको

