हॅलो मी…., आवाज उदयनराजेंचा गंडला आमिर खान, काय आहे नेमकं प्रकरण?

साताऱ्यातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे खासदार उदयनराजे भोसले यांच्या आवाजाची नक्कल करत चक्क बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हॅलो मी...., आवाज उदयनराजेंचा गंडला आमिर खान, काय आहे नेमकं प्रकरण?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 17, 2025 | 8:06 PM

साताऱ्यातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे खासदार उदयनराजे भोसले यांच्या आवाजाची नक्कल करत चक्क बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अली अमानत शेख असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. तो मी उदयनराजे भोसले बोलतोय असं सांगून लोकांना भेटण्यासाठी अभिनेता आमिर खान याच्याकडे पाठवत होता. प्रकरण उघड होताच, या प्रकरणात आरोपीविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

काय आहे नेमकं प्रकरण? 

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा दुरुपयोग करून पुण्यातील अली अमानत शेख याने अभिनेता आमिर खान याची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण स्वत: उदयनराजे भोसले बोलतोय असं हा आरोपी भासवायचा त्यानंतर तो आमिर खानशी संर्पक साधून  “माझे काही लोक आपल्याला भेटायला येतील, त्यांना मदत करा”, असा फोन करायचा. हा सर्व प्रकार जानेवारी महिन्यापासून सुरू होता.

त्यानंतर  आमिर खान यांच्या टीमने उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय पंकज चव्हाण यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पंकज चव्हाण यांनी  स्वतः संशयित आरोपीला फोन करून खातरजमा केली असता, त्यांना देखील आरोपीने आपण उदयनराजे भोसले बोलतोय असं भासवलं. त्यानंतर याप्रकरणात आरोपी  अली अमानत शेख याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासाला सुरुवात 

उदयनराजे भोसले हे बोलत असल्याचं भासून आरोपीने आमिर खानला फोन केला, त्याची फसवणूक केली. “माझे काही लोक आपल्याला भेटायला येतील, त्यांना मदत करा”, असा फोन तो आमिर खान याला करायचा, हा सर्व प्रकार जानेवारी महिन्यापासून सुरू होता, मात्र हे प्रकरण आता समोर आलं आहे, या प्रकरणानं खळबळ उडाली असून, आरोपीविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.