AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगाव जिल्ह्यात तलाठ्यासोबत भयंकर घडलं, आधी टॅक्टरखाली फेकलं, मग चिरडण्याचा प्रयत्न

जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादयाक घटना समोर आली आहे, अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यासोबत भयंकर घटना घडली आहे, या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यात तलाठ्यासोबत भयंकर घडलं, आधी टॅक्टरखाली फेकलं, मग चिरडण्याचा प्रयत्न
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2025 | 9:45 PM
Share

जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादयाक घटना समोर आली आहे, अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यासोबत भयंकर घटना घडली आहे, आरोपींनी तलाठ्याला आधी टॅक्टरवरून खाली ओढलं त्यानंतर त्याला टॅक्टरच्या चाकाखाली घालून चिरडण्याचा प्रयत्न केला आहे, सुदैवानं या घटनेत या तलाठ्याचा जीव वाचला आहे, मात्र तो या घटनेत गंभीर जाखमी झाला आहे, या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगावच्या चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे ही घटना घडली आहे, तलाठ्याला ट्रॅक्टरवरून फेकून देत त्याला  टॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला, या घटनेत सुदैवानं तलाठ्याचा जीव वाचला आहे, मात्र या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. जडे असं या तलाठ्याचं नाव आहे.

जडे हे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी जळगावच्या चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे  गेले होते, यावेळी ही घटना घडली आहे. अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई सुरू असताना अंधाराचा फायदा घेऊन इतर वाहने पळून गेली, मात्र एक टॅक्टर पथकाच्या हाती लागला. या टॅक्टरवर जडे बसले होते, हा टॅक्टर  जप्त करून तहसीलदार कार्यालयात आणला जात असताना, ट्रॅक्टरवर बसलेले तलाठी यांना चालक आणि मालकाने खाली ओढले, तसेच त्यांनी टॅक्टरच्या चाकाखाली चिरडून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. या घटनेतून ते थोडक्यात बचावले आहेत, मात्र या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. कारवाईदरम्यान अंधाराचा फायदा घेऊन इतर वाहने पळून गेली, मात्र एक ट्रॅक्टर पथकाच्या हाती लागला होता, याचदरम्यान हा प्रकार घडला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...