AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा धक्का, गावात जाताच सीजेपी कार्यकर्त्यांवर गुन्हे, महाराष्ट्रातच…

अभिजीत दीपके यांच्या 'स्कूल ठीक करो' अभियानांतर्गत शाळांची पाहणी करणाऱ्या CJP कार्यकर्त्यांवर बीडमध्ये मुख्याध्यापकांना मारहाण केल्याचा आरोप करत गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेने दीपके आणि CJP ला मोठा धक्का बसला आहे. शिक्षणमंत्र्यांनी सहकार्याचे आश्वासन दिल्यानंतरही ही कारवाई झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा धक्का, गावात जाताच सीजेपी कार्यकर्त्यांवर गुन्हे, महाराष्ट्रातच...
abhijeet dipkeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 26, 2026 | 3:58 PM
Share

नीट परीक्षा पेपर फुटीच्या आंदोलनात अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्कूल ठीक करो हे अभियान हाती घेतलं आहे. या अभियानांतर्गत कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते शाळांची पाहणी करत आहेत. शाळांच्या समस्या चव्हाट्यावर आणत आहेत. जयपूरमध्ये एका शाळेत गेल्यावर सीजेपीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली होती. या कार्यकर्त्यांना पळवून पळवून मारहाण करण्यात आली होती. सीजेपीचे आशुतोष रांका यांनाही धक्काबुक्की करण्यात आली होती. हाच अनुभव सीजेपीच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात आला आहे. बीडमध्ये या सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा अभिजीत दीपकेंसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

बीडच्या आष्टी तालुक्यातील वेताळवाडी जिल्हा परिषद शाळेत सीजेपीचे कार्यकर्ते आले होते. या कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन शाळेतील असुविधांचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली होती. मात्र, कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर मुख्याध्यापकांना मारहाण आणि दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्याध्यापक राम खाडे यांच्या तक्रारीवरून सीजेपी कार्यकर्ते तुकाराम वनवे आणि त्यांच्या साथीदाराविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीजेपीचे आंदोलन

कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने सीजेपीचे कार्यकर्ते संतापले आहेत. शाळा प्रशासनाने सूडबुद्धीने खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप करत कॉक्रोच जनता पार्टीने थेट गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी परस्परविरोधी आरोप-प्रत्यारोपांमुळे सीजेपीच्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानाला गालबोट लागले आहे. सीजेपी कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिक्षण मंत्र्यांना भेटूनही

दरम्यान, काल सीजेपीच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मुंबईत भेट घेतली होती. यावेळी त्यांनी भुसे यांना स्कूल ठीक करो अभियानाची माहिती आणि उद्देश सांगितला होता. स्कूल ठीक करो या मोहिमे अंतर्गत पाहणी करण्यात येणाऱ्या शाळेमधून मज्जाव करण्यात येत असल्याचे प्रकार समोर येत असल्याचेही त्यांनी भुसे यांच्या निदर्शनास आणून दिले होते. यावेळी भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तुम्हाला सहकार्य केलं जाणार असल्याचं म्हटलं होतं. तसेच शाळा पाहणी दरम्यान काही त्रुटी आढळल्यास, काही अडचण असल्यास सचिवांना फोन किंवा ई-मेल करा, अशा सूचनाही भुसे यांनी सीजेपी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्यानंतर आज बीडमध्ये हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ