Video : औरंगाबादमध्ये गादीच्या कारखान्याला भीषण आग, आगीत कारखान्याचं मोठं नुकसान
औरंगाबादमध्ये गादीच्या कारखान्याला भीषण आग लागली होती. औरंगाबादजवळच्या पाडेगावमध्ये ही घटना घडली. पुढच्या काहीच वेळात स्थानिकांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. Aurangabad Lucky Mettress Kharkhana Fire

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये गादीच्या कारखान्याला भीषण आग लागली होती. औरंगाबादजवळच्या पाडेगावमध्ये ही घटना घडली. आग लागल्यानंतर काही वेळात स्थानिकांच्या मदतीने अग्निशमनदलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.
पाडेगावमधल्या लकी गादी कारखान्याला आग लागल्याचं कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आणि पुढच्या काहीच वेळात स्थानिकांच्या मदतीने त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.
शॉर्टसर्किटमुळे गादी कारखान्याला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत कारखान्याचं मोठं नुकसान झालं आहे. आगीमुळे या गादी कारखान्याचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे. या आगीत कारखान्याचं नुकसान झालं असलं तरी सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
औरंगाबाद ब्रेकिंग :-
गादीच्या कारखान्याला भीषण आग..
औरंगाबाद जवळील पाडेगाव येथील लकी गादी कारखान्यास आग pic.twitter.com/KW1ceZWUyC
— Akshay Adhav (@Adhav_Akshay1) July 17, 2021
हे ही वाचा :
