AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rains: मुंबईत आजही मुसळधार पावसाचा अंदाज, विमानतळावरील धावपट्टीवर पाणी, ठाणे रायगडला रेड अ‌ॅलर्ट

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई आणि त्याच्या जवळपासच्या भागात पुढील 24 तासात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर, काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

Mumbai Rains: मुंबईत आजही मुसळधार पावसाचा अंदाज, विमानतळावरील धावपट्टीवर पाणी, ठाणे रायगडला रेड अ‌ॅलर्ट
मुंबई पाऊस (प्रातिनिधिक फोटो)
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 10:46 AM
Share

मुंबई: मान्सूनच्या पावसाची मुंबईत जोरदार बॅटिंग सुरुच असल्याचं चित्र आहे. गुरुवारी रात्रीपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली असून आजही जोरदार पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई आणि त्याच्या जवळपासच्या भागात पुढील 24 तासात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर, काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. मुंबईतील काही भागांना रेड अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी साचल्याचं समोर आल्यानं काही विमानांच्या वेळा देखील बदलण्यात येऊ शकतात. मुंबईसह ठाणे आणि रायगडला देखील रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

लोकल आजही प्रभावित होणार

मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं वडाळा, सायन आणि गांधी मार्केटमधील रस्त्यांवर पाणी साचलं आहे. तर मुंबई महापालिकेनं बेस्टच्या मार्गातही बेदल केले आहेत. हार्बर लाईनवरील लोकल ट्रेन सेवा देखील प्रभावित झाली आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यानं शुक्रावारी दिवसभर कुर्ला ते विद्याविहार या दरम्यान लोकल ट्रेन 20 ते 25 मिनिचं उशिरानं चालल्या होत्या. त्यामुळे स्लो मार्गावरील ट्रेन फास्ट मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. दरम्यान पावसामुळे आजही लोकल सेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

77 टक्के अधिक पावसाची नोंद

ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक देखील काही काळासाठी ठप्प झालेली पाहायला मिळाली. मुंबईत दहिसर नाक्यावर देखील वाहतूक कोंडी झाली होती. हवामान विभागाच्या वतीनं आज देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 1जूनपासून मुंबईत 1291.8 मिमी पाऊस झाला आहे. हा मुंबईतील सामान्य पावासापेक्षा अधिक आहे. मुंबईत गेल्या आठ दिवसात जवळपास 302 मिमी पाऊस झाला आहे. हा सामान्य पावसापेक्षा 77 टक्के जादा पाऊस आहे. पावसामुळे पाणी साठल्याची प्रकरण पाहता महापालिकेनं सखल भागात जाऊ नये, असं आवाहन केलं आहे.

हवामान विभागानं गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला होता. मात्र, हवामानाची बदलेली स्थिती पाहता रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ आर के जेनमानी मुंबईतील पावसाची स्थिती पाहता रेड अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मीरा रोड मध्ये 73 मिमी, जुहू मध्ये 136 मिमी, महालक्ष्मी 56.5 मिमी, सांताक्रुजमध्ये 25.1, दहिसरमध्ये 76.5 मिमा पाऊस झाला आहे.

इतर बातम्या

मुंबईत मनसेला धक्का, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस आदित्य शिरोडकरांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबईत नोंदणी विवाहाबाबत मोठा निर्णय ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन विवाह नोंदणी बंद, तर ऑफलाईन सुरू

Mumbai Rains Heavy rain alert for Mumbai today water filled airport runway Red alert in Thane and Raigad also

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.