इतिहासात प्रथमच स्वतंत्र ‘सहकार मंत्रालय’, कार्यभार अमित शहांकडे, फडणवीस अभिनंदनासाठी दिल्लीत, काही संकेत??

विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस राजधानी नवी दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्राच्या नव्याने झालेल्या मंत्र्यांची भेट घेतली. याचसोबत त्यांनी केंद्रिय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली.

इतिहासात प्रथमच स्वतंत्र 'सहकार मंत्रालय', कार्यभार अमित शहांकडे, फडणवीस अभिनंदनासाठी दिल्लीत, काही संकेत??
देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदारांनी अमित शहा यांची भेट घेतली.
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 10:09 AM

नवी दिल्ली :  2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत बहुमताने सत्तारूढ झालेल्या भाजपा सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील चार नेत्यांना मंत्रीपदी संधी देण्यात आली. तर देशाच्या इतिहासात प्रथमच सहकार मंत्रालयाची स्थापना करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मास्टर स्ट्रोक लगावला. या मंत्रालयामुळे राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर दबाव निर्माण झाल्याची चर्चा आहे. यातच दिल्ली दरबारी गेलेल्या फडणवीसांनी अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना यापुढच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Devendra fadanvis Meet Amit Shaha In new Delhi)

फडणवीसांकडून अमित शहा यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा

विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस राजधानी नवी दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्राच्या नव्याने झालेल्या मंत्र्यांची भेट घेतली. याचसोबत त्यांनी केंद्रिय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासात प्रथमच स्वतंत्र ‘सहकार मंत्रालय’ निर्माण करून त्याचा कार्यभार अमित शाह यांना सोपविल्याबद्दल अमित शाह यांचं फडणवीसांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत भाजप आमदार जयकुमार गोरे, राहुल कुल उपस्थित होते.

सहकार मंत्रालयामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर दबाव?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात अनेक सहकारी संस्था आहेत. या सहकारी संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने महाराष्ट्रात 15 वर्षे सत्ता टिकवली. मग सहकारी कारखाने असोत, जिल्हा बँक असो, वा दूध संघ… या संस्थांच्या माध्यमातून काँग्रेस-राष्ट्रवादीने शेतकऱ्यांशी कायम कनेक्ट ठेवला. पर्यायने कृषी संस्थामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचा नेहमीच हस्तक्षेप राहिला. आता याच संस्थांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सहकार चळवळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा वाटा राहिलेला आहे. सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, दूध संघ राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ताब्यात होते. म्हणजेच सहकार चळवळीत नेहमीच राष्ट्रवादीचे नेते अग्रभागी राहिलेत. परंतु आता अमित शहा यांच्याकडे सहकार खातं गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची जी सहकार क्षेत्रातील इनव्हॉलमेंट आहे, ती आता मोडीत निघणार अशा चर्चाही आता रंगू लागल्या आहेत.

महाराष्ट्रातील सत्तेचा मार्ग हा सहकार संस्थांमधून जातो. तो मार्गच आता अमित शाहांच्या अधिकारात आहे. त्यामुळे कालच्या मंत्रिमंडळ विस्तारात ठाकरे सरकारवर डायरेक्ट इफेक्ट पाडेल अशी कोणती घटना असेल तर ती अमित शाहांकडे सहकार खातं असणं. ही घटना नारायण राणेंना मंत्री बनवण्यापेक्षाही ठाकरे सरकारवर जास्त परिणाम करणारी आहे. त्यामुळे येत्या काळात सहकार क्षेत्राच्या अनुषंगाने महाराष्ट्रात कुठेकुठे भूकंप होतात आणि कुणाकुणाला हादरे बसतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, ज्यावर पुढच्या काही वर्षांचं राजकारण अवलंबून असेल.

सहकार मंत्रालयामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर दबाव? शरद पवार म्हणतात, नाहीच!

केंद्रात सहकार खातं तयार करण्यात आल्याने त्यावरून अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्य घटनेनुसार सहकार हा विषय राज्य सरकारचाच आहे. राज्याने केलेल्या सहकार कायद्यात केंद्राला हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे नवं सहकार खातं निर्माण झाल्याने महाराष्ट्रावर गंडांतर येणार नाही. सध्या सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना काहीही अर्थ नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

(Devendra fadanvis Meet Amit Shaha In new Delhi)

हे ही वाचा :

मोदींचा मास्टरस्ट्रोक, अमित शहांकडे सहकार खात्याची जबाबदारी, काँग्रेस राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार?

राज्यघटनेनुसार सहकार हा विषय राज्य सरकारचाच, महाराष्ट्रात गंडांतर येणार नाही; शरद पवारांचं मोठं विधान

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.