AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक : औरंगाबादेत रुग्णालयाच्या पायरीवरच रुग्णाचा तडफडून मृत्यू, गंगापूर तालुक्यात खळबळ

दरम्यान रुग्णालयाच्या पायऱ्या चढत असतानाच मृत्यूमुखी पडलेल्या या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे हा मृतदेह सध्या बेवारस अवस्थेत आहे.

धक्कादायक : औरंगाबादेत रुग्णालयाच्या पायरीवरच रुग्णाचा तडफडून मृत्यू, गंगापूर तालुक्यात खळबळ
ढाक्यात इस्कॉनच्या मंदिरावर हल्लाImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 16, 2022 | 10:11 AM
Share

औरंगाबादः  औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यात (Gangapur hospital) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गंगापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या दारातच एका रुग्णाचा वेदनादायी मृत्यू (Patient death) झाल्यानं खळबळ माजली आहे. रुग्णालयाची पायरी चढत असतानाच हा रुग्ण अत्यवस्थ झाला. मात्र आरोग्य अधिकारी आणि डॉक्टर्सनी कुणीही त्याच्यापर्यंत धाव घेतली नाही. त्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात पोहोचूनही सदर रुग्णाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गंगापूर उप जिल्हा रुग्णालयातील अधिकारी आणि डॉक्टर्सच्या (Gangapur Doctors) अक्षम्य कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या डॉक्टरांमध्ये एवढी अंसेवदनशीलता कशी येऊ शकते, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बेवारस रुग्णाचा मृत्यू

दरम्यान रुग्णालयाच्या पायऱ्या चढत असतानाच मृत्यूमुखी पडलेल्या या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे हा मृतदेह सध्या बेवारस अवस्थेत आहे. मंगळवारी अत्यवस्थ अवस्थेत तो रुग्णालयात पोहोचला, मात्र डॉक्टर्स आणि नर्सेसने त्याच्यापर्यंत तत्काळ मदत पोहोचवली नाही. त्यामुळे या इसमाचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. यामुळे गंगापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर प्रत्यक्षदर्शींकडून संताप व्यक्त केला जात आहे.

घाटी रुग्णालयात डॉक्टरांचे आंदोलन

दरम्यान, औरंगाबाद शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अर्थात घाटीमध्ये वरिष्ठ डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल होत आहे. मंगळवारी येथील 6 शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या तर 6 आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटनेने घाटीत 5 फेब्रुवारीपासून शैक्षणिक व प्रशासकीय कामावर बहिष्कार घालून आंदोलनाला सुरुवात केली. सोमवारी वरिष्ठ डॉक्टरांनी हे आंदोलन तीव्र करत रुग्णसेवेवर बहिष्कार घातला. मंगळवारीही हे आंदोलन काय राहिले. कालबद्ध पदोन्नती आणि वेतन श्रेणीवर सातवा वेतन आयोग लागू करणे, अस्थायी डॉक्टरांना कायम करणे या प्रमुख मागण्यांवर डॉक्टरांचे हे आंदोलन सुरु आहे. या विषयावर वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसोबत शिक्षक प्रतिनिधींच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. मंगळवारी घाटी रुग्णालयाततील सिझेरियन आणि प्रसूती कक्ष वगळता इतर शस्त्रक्रिया कक्ष सामसूम होते. तसेच बाह्य रुग्णांची संख्याही कमी दिसून आली.

इतर बातम्या-

Video: औरंगाबादमध्ये मारहाणीच्या घटना का वाढतायत? आता पाचोड गावात मंडळ अधिकाऱ्याला बदडलं

नवरा बायकोचा वाद, संसारात घात, बायकोनं भांडणात घर सोडलं, नवऱ्यानं जे केलं त्यानं नागपूर हादरलं

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.