Video: औरंगाबादमध्ये मारहाणीच्या घटना का वाढतायत? आता पाचोड गावात मंडळ अधिकाऱ्याला बदडलं

Video: औरंगाबादमध्ये मारहाणीच्या घटना का वाढतायत? आता पाचोड गावात मंडळ अधिकाऱ्याला बदडलं
पाचोड मंडळ अधिकारी कार्यालयात मारहाण
Image Credit source: TV9 Marathi

थेट कायदा हातात घेऊन एखाद्याला मारहाण करण्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत, याचाच अर्थ नागरिकांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेवरही अशा घटनांमुळे प्रश्नचिन्ह उभे राहात आहे.

दत्ता कानवटे

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Mar 16, 2022 | 10:38 AM

औरंगाबादः औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासून मारहाणाच्या (Aurangabad fighting) घटना वाढलेल्या दिसून येत आहेत. कालच करंजखेडा बाजारसमितीत दोन व्यापाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती तर आज पाचोड गावात मंडळ अधिकाऱ्यालाच मारहाण (Pachod officer beaten) केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मंडळ अधिकारी काम करत नसल्यामुळे ही मारहाण झाल्याचं कारण समोर आलं आहे. काल समोर आलेल्या घटनेत, करंजखेडा (Karanjkheda trader beaten) येथील घटनेत शेतकऱ्याच्या मालाला जास्त भाव दिला म्हणून संबंधित व्यापाऱ्यावर संताप काढण्यात आला होता तर आज पाचोड गावात मंडळ अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेवरून अशा प्रकारे राग व्यक्त करण्यात आला आहे. मात्र लोकशाही मार्गाने एखाद्या गोष्टीसाठी दाद मागण्याची कायद्यानुसार, सुविधा असताना हे प्रकरण मारहाणीपर्यंत, एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत जातंय, हे समाजासाठी जास्त धोकादायक आहे. तसेच थेट कायदा हातात घेऊन एखाद्याला मारहाण करण्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत, याचाच दुसरा अर्थ म्हणजे नागरिकांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेवरही अशा घटनांमुळे प्रश्नचिन्ह उभे राहात आहे.

पाचोडमध्ये काय घडलं?

औरंगाबादमधील पाचोड गावातील मंडळ अधिकारी काम करत नसल्याचा आरोप करत श्रीमंत अहिरे याने आधी वादावादीला सुरुवात केली. त्यानंतर या वादाचं रुपांतर भांडणात आणि थेट मारहाणीत झालं. मंडळ अधिकारी कार्यालयातच जयकुमार केकान या अधिकाऱ्याला बेदम चोप देण्यात आला. मारहाणीच्या या आवाजाने आजूबाजूचे नागरिक गोळा झाले आणि त्यांनी या प्रकारात हस्तक्षेप केला. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आता पाचोड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

करंजखेड्यात काय घडलं?

कन्नड तालुक्यातील करंजखेडा उपबाजार समितीत मका आणि भुसार व्यापाऱ्यांना मारहाणीची घटना समोर आली होती. रविवारी हा प्रकार घडला होता. साहिल जयकुमार चुडीवाल यांचे करंजखेड येथे भुसार मालाचे दुकान आहे. मागील चार वर्षांपासून ते आणि त्यांचे भाऊ भुसार मालाच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. रविवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मक्याची खरेदी विक्री चालू असताना येथील हर्षवर्धन निकम यांनी नेवपूर येथील संजय सुरडकर या शेतकऱ्याचा मका खरेदी करून पावतीवर खाडाखोड केली होती. ही खाडाखोड का केली, असे म्हणत हर्षवर्धन निकम, दत्तू गवारे, संदीप निकम आणि नीलेश यांनी चुडीवाल बंधूंना दुकानात घुसून मारहाण केली. तसेच दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत साहिल चुडीवाल व त्यांचा भाऊ सुयोग जखमी झाले. पिशोर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल असून तीन दिवस उलटूनही एकाही आरोपीला अटक झालेली नाही.

इतर बातम्या-

नवरा बायकोचा वाद, संसारात घात, बायकोनं भांडणात घर सोडलं, नवऱ्यानं जे केलं त्यानं नागपूर हादरलं

मुकेश अंबानींच्या नातवाचा ‘केजी’ला प्रवेश; …म्हणून आकाश आणि श्लोका आपल्या मुलाला भारतातच शिकवणार

Milk Price : दूध उत्पादकांना ‘अच्छे दिन’, गायी दुधाच्या दरात लिटरमागे 3 रुपयांची वाढ, दूध संघाचा निर्णय काय?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें