Milk Price : दूध उत्पादकांना ‘अच्छे दिन’, गायी दुधाच्या दरात लिटरमागे 3 रुपयांची वाढ, दूध संघाचा निर्णय काय?

कधी नव्हे ते महिन्याभरात दुधाच्या दरात सलग दोनवेळा वाढ झाली आहे. एकीकडे उत्पादनात घट आणि निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत असताना दूध संघाने घेतलेला निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे खरेदीदर हा तीन रुपयांनी वाढणार आहे तर त्याची विक्री ही दोन रुपयांनी वाढणार आहे.

Milk Price : दूध उत्पादकांना 'अच्छे दिन', गायी दुधाच्या दरात लिटरमागे 3 रुपयांची वाढ, दूध संघाचा निर्णय काय?
गायी दुधाच्या दरात पुन्हा तीन रुपयांनी वाढ झालेली आहे.
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 9:28 AM

पुणे : कधी नव्हे ते महिन्याभरात (Milk Rate) दुधाच्या दरात सलग दोनवेळा वाढ झाली आहे. एकीकडे उत्पादनात घट आणि निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत असताना (Milk Producer Union) दूध संघाने घेतलेला निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे खरेदीदर हा तीन रुपयांनी वाढणार आहे तर त्याची विक्री ही दोन रुपयांनी वाढणार आहे. त्यामुळे (Consumer) ग्राहकांनाही याचा अधिकचा फटका बसू नये असा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात सहकारी आणि खासगी अशा 45 दुग्ध प्रकल्पांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून याची अंमलबजावणी ही त्वरीत केली जाणार आहे. गतमहिन्यातच दुधाच्या दरात वाढ झाली होती एवढेच नाही तर त्याची स्थानिक पातळीवर अंमलबजावणीही झाली आहे.

दरवाढ मागची कारणे काय ?

दूध पावडर आणि लोणी याचे दर वाढले असल्याने दुधाच्या मागणीही वाढत आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून दूध उत्पादनात घट झाली आहे. या सर्व परस्थितीमुळे 30 लिटर असलेल्या दुधाचे दर आता 33 रुपये लिटर होणार आहेत. शिवाय निर्णय सरसकट असणार आहे. दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या दरात वाढ झाल्याने आता याचा फायदा उत्पादकांनाही होणार आहे. स्थानिक पातळीवर याची त्वरीत अंमलबजावणी केली जाणार असल्याचाही निर्णय बैठकी दरम्यान घेण्यात आला आहे. इंधनाचे आणि पशूखाद्याचे वाढलेले दर याचाही परिणाम या दरवाढीवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

विक्रीदराचाही योग्य निर्णय

दुधाच्या दरात वाढ करुन केवळ शेतकऱ्यांना दिलासा आणि ग्राहकांना त्याचा फटका बसू नये याचा विचारही दूध उत्पादक संघाने घेतलेला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी लिटरमागे 3 रुपये अधिकचे मिळणार आहेत तर या बदल्यात ग्राहकांना केवळ 2 रुपये अधिकचे आकारले जाणार आहेत. आतापर्यंत ग्राहकांना गायीचे दूध हे 48 रुपये लिटर प्रमाणे घ्यावे लागत होते ते 50 रुपयांनी घ्यावे लागणार तर दूध उत्पादकांचे 30 रुपये लिटरचे दूध संघाकडून 33 रुपये लिटर प्रमाणे घेतले जाणार आहे.

दूध संघाच्या बैठकीत नेमकं घडल काय?

महाराष्ट्र दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक यांची बैठक पार पडली असून दूध पावडर व दुग्धजन्य पदार्थांचे वाढते दर पाहता आता दुधाच्या दरातही वाढ होणे गरजेचे आहे. शिवाय पशूखाद्याचे वाढलेले दर आणि स्थानिक पातळीवर घटलेले उत्पादन गायीच्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची लूट होत आहे त्या प्रक्रिया व्यावसायिकांवर कारवाई संदर्भातही चर्चा झाली आहे.

संबंधित बातम्या :

बोगस रासायनिक खतांमुळे द्राक्षांचे घड जळाले, माढा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये घबराहट; कृषी खात्याची कारवाई

अवकाळी टळली पण ढगाळ वातावरणामुळे व्हायचे तेच झाले,कांदा पीक धोक्यात, काय आहे उपाय?

Video | गाय मरणाला टेकली होती, शेतकरी तिला खांद्यावर उचलून घेऊन आला, आता वासराचं धुमधडाक्यात बारसं!

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.