Video | गाय मरणाला टेकली होती, शेतकरी तिला खांद्यावर उचलून घेऊन आला, आता वासराचं धुमधडाक्यात बारसं!

Nanded : यावेळी वासराला पाळण्यात बसवून फोटोसेशल पार पडलं. गावातील महिलांनीही मोठ्या उत्साहात पाळणे म्हणत वासराचं नाव ठेवलं.

Video | गाय मरणाला टेकली होती, शेतकरी तिला खांद्यावर उचलून घेऊन आला, आता वासराचं धुमधडाक्यात बारसं!
वासराचं बारसं करता शेतकऱ्यांचं खास फोटोसेशनImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 7:52 PM

नांदेड : शेतकरी आणि त्याची दुभती जनावरं, यांचं नातं किती खास आहे, अनमोल आहे, हे अधोरेखित करणारी एक हृदस्पर्शी घटना (Human interest) समोर आली आहे. घटना नांदेड जिल्ह्यातल्या एका गावातली आहे. एक गाय अत्यंत बेजार झाली होती. अशक्तपणानं कोलमडली होती. मरणाला टेकलेल्या या गाईकडे एका संवेदनशील शेतकऱ्याची (Farmer) नजर पडली. शेतकऱ्याला राहावलं नाही. त्यानं गाईला आपल्या खांद्यावर उचललं. थेट घर गाठलं. मनापासून या गाईची (care of cow) सुश्रुशा केली. तिचं औषधपाणी केलं. तिला खाऊ खातलं. पुन्हा नवं आयुष्य दिलं. शेतकऱ्यानं केलेल्या संगोपनानंतर गाईला नवा जन्मच दिला होता. आता याच गाईच्या पोटी एक वासरु जन्माला आलं आहे. या वासरानं शेतकऱ्याच्या कुटुंबातला आनंद द्वीगुणित केलाय. घरात एकही मुलगी नाही. त्यामुळे या वासराला मुलगी मानत शेतकऱ्यांनं धुमधडाक्यात बारसं पार पडलंय. नांदेडमधील या शेतकऱ्याची चर्चा अख्या राज्यात सुरु झाली आहे.

आनंद आणि उत्साह

या शेतकऱ्यांचं नाव आहे मारुती मारजवाडे. नांदेड जिल्ह्यातल्या खानापूरचे ते रहिवासी. दोन वर्षांपूर्वी मारुते हे शेतात गेले होते. तेव्हा त्यांना एक गाय मरणासन्न अवस्थेत सापडली होती. या शेतकऱ्यानं गाईला आपल्या खांद्यावर घेतलं आणि घर गाठलं. घरी जाऊन शेतकऱ्यानं या गाईला धडधाकट केलं. त्यानंतर आता या गाईनं एक वासरु जन्माला घातलंय.

आपलंच लेकरु असल्यासारखं या शेतकऱ्यानं या वासराचं मोठ्या थाटामाटात स्वागत केलंय. अख्खा गाव या वासराच्या बारशासाठी एकवटला होता. मारुती मारजवाडे यांना मुलगी नाही. या वासराच्या रुपात आपल्याला मुलगी जन्माला आली आहे, असं समजून या मारुती यांनी सण साजरा करावा, तसं या वासराचं बारसं धुमधडाक्यात साजरं केलंय.

गावजेवण आणि अनोखा पाळणा

यावेळी वासराला पाळण्यात बसवून फोटोसेशल पार पडलं. गावातील महिलांनीही मोठ्या उत्साहात पाळणे म्हणत वासराचं नाव ठेवलं. जवळपास चारशे पाचशे जणांना वरणभात, पोळीभाजी, गोडबुंदी, खारी बुंदी असं गावजेवण मारुती यांनी या वेळी दिलंय. पशुपालक मारोती मारजवाडे यांनी केलेलं अनोखं बारसं सर्वत्र चर्चेचा विषय ठरलंय.

पाहा व्हिडीओ :

कृषी संदर्भातील इतर बातम्या :

आता उन्हात होरपळतोय फळांचा राजा, तिसऱ्या बहरातील हापूसला धोका कशाचा?

…म्हणे महिला शेतकरी सन्मान वर्ष, सन्मान सोडाच- शेतकरी महिलेच्या कष्टाचीही कदर नाही..!

Photo Gallery : सरकार निर्णयाचे ‘असे’ हे स्वागत, जळगावात केळीच्या खोडाचे पूजन अन् जंगी मिरवणूक

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.