…. तर औरंगाबादचं पाणी पूर्ण बंद होणार, जायकवाडी धरणातून पाणी उपसा होणार नाही, महापालिकेला कोणती नोटीस?

| Updated on: Feb 18, 2022 | 3:00 AM

औरंगाबाद शहराला पैठण येथील जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा होतो. त्यासाठी महापालिकेने दोन पाणी योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. महापालिका शहरवासियांना पाणीपुरवठा करून त्यांच्याकडून पाणी पट्टी वसूल करते. तीच पद्धत वापरून पाटबंधारे विभाग पाणी उपशासाठी महापालिकेला ठराविक रक्कम आकारते.

.... तर औरंगाबादचं पाणी पूर्ण बंद होणार, जायकवाडी धरणातून पाणी उपसा होणार नाही, महापालिकेला कोणती नोटीस?
Follow us on

औरंगाबादः शहराला पाणीपुरवठा (Water Supply ) करण्यासाठी महापालिका जायकवाडी धरणातून (Jayakwadi Dam) दररोज सुमारे दीडशे एमएलडी पाणी उपसा करते. मात्र मागील अनेक वर्षांपासून माहापिलेकेने (Aurangabad municipal Corporation) पाटबंधारे खात्याकडे पाणी बिलच भरलेले नाही. एवढ्या वर्षांची पाणी बिलाची थकबाकी अखेर 26 कोटी 32 लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे आता पाटबंधारे विभागाने महापालिका प्रशासनाला नोटीस बजाववी आहे. 18 फेब्रुवारीपर्यंत थकबाकीचा भरणा नाही केला तर सोमवारपासून 21 फेब्रुवारीपासून टप्प्या-टप्प्याने पाणी उपसा बंद करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

…तर 25 फेब्रुवारीला पूर्णपणे उपसा बंद

महापालिकेने पाणी बिलाची थकबाकीची रक्कम न भरल्यास टप्प्या-टप्प्याने जायकवाडीतून पाणी उपसा बंद केला जाणार आहे. 21 फेब्रुवारी रोजी पाणी उपसा दोन तासांसाठी बंद केला जाईल. त्यानंतर 22 फेब्रुवारी रोजी चार तासांकरिता, 23 फेब्रुवारी रोजी सहा तासांकरिता, 24 फेब्रुवारी रोजी आठ तासांकरिता आणि 25 फेब्रुवारी रोजी पूर्णपणे पाणी उपसा बंद केला जाईल, असा इशारा पाटबंधारे खात्याने महापालिकेला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

अनेक वर्षांची थकबाकी

औरंगाबाद शहराला पैठण येथील जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा होतो. त्यासाठी महापालिकेने दोन पाणी योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. महापालिका शहरवासियांना पाणीपुरवठा करून त्यांच्याकडून पाणी पट्टी वसूल करते. तीच पद्धत वापरून पाटबंधारे विभाग पाणी उपशासाठी महापालिकेला ठराविक रक्कम आकारते. मात्र महापालिकेकडून ही रक्कम भरण्यास टाळाटाळ बोत आहे. पाटबंधारे खात्याने कारवाईचा इशारा देताच मनपाकडून किरकोळ रक्कम भरून वेळ मारून नेली जाते. त्यामुळे महापालिकेकडील पाणी बिलाची थकबाकी आता 26 कोटी 32 लाखांच्या घरात पोहोचली आहे. मात्र आता पाटबंधारे खात्याने महापालिकेला नोटीस बजावली असून 18 फेब्रुवारीपर्यंत थकबाकीचा भरणा करण्याची सूचना करण्यात आली आहे. ती न केल्यास 21 फेब्रुवारीपासून पाणी उपसा टप्प्या-टप्प्याने बंद करण्यात येणार आहे.

इतर बातम्या-

‘चला बसुया’ असं पुरुषांपेक्षा महिलाच जास्त म्हणतायत! दारु पिणाऱ्यांची ही आकडेवारी एकदा बघाच

हिमालयातल्या अज्ञात साधूच्या इशाऱ्यावर कोट्यवधींचा शेअर बाजार? माजी सीईओ चित्रा रामकृष्णांवर छापे, म्हणतात, ती एक अदृश्य शक्ती!