VIDEO: अमेरिकेतल्या खुनाला आठवडा पूर्ण, अंबाजोगाईत अजूनही चर्चाच, मृत आरतीच्या कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया

बालाजी रुद्रवार आणि आरती रुद्रवार यांचा खून होऊन एक आठवडा उलटला आहे. (balaji rudrawar murder case: no clue find after week)

VIDEO: अमेरिकेतल्या खुनाला आठवडा पूर्ण, अंबाजोगाईत अजूनही चर्चाच, मृत आरतीच्या कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया
balaji rudrawar
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 5:04 PM

बीड: बालाजी रुद्रवार आणि आरती रुद्रवार यांचा खून होऊन एक आठवडा उलटला आहे. तरीही त्यांच्या खूनाचा तपास अजून लागलेला नाही. त्यामुळे अंबाजोगाईत या प्रकरणावर उलटसुलट चर्चा होत आहे. या प्रकरणी मृत आरती रुद्रवारच्या कुटुंबीयांनीही पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. (balaji rudrawar murder case: no clue find after week)

बीडच्या अंबाजोगाई येथील तरुण दाम्पत्याचा अमेरिका येथे मृत्यू होऊन आठवडा उलटला आहे. मात्र तरी देखील या मृत्यू मागील गूढ उकलेलं नाही. अमेरिकन न्यूज एजन्सीमार्फत दिलेल्या बातमीनुसार पतीने पत्नीचा भोसकून खून केला आहे. मात्र रूद्रवार कुटुंबीयांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. अंबाजोगाईतील प्रसिद्ध व्यापारी भारत रूद्रवार यांचे चिरंजीव बालाजी मागील सहा वर्षांपासून न्यूजर्सीमधील अर्लिंग्टन भागात कुटूंबासह स्थायिक झाले होते. बालाजी त्यांच्या पत्नी आणि चार वर्षीय मुलीसह वास्तव्यास होते. मात्र बुधवारी घडलेल्या घटनेने अंबाजोगाईसह राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेला आठवडा होतोय. तरी देखील या घटनेचा उलगडा झालेला नाही. अमेरिकेतील माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे रुद्रवार कुटुंबाकडून सांगण्यात येत आहे. मुलीचा संसार आनंदात होता, तसेच जावई मुलासारखे होते. त्यामुळे ही हत्या आहे असं वाटत नाही, असं आरती रुद्रवार यांचे वडील रामचंद्र डाके यांनी म्हटलं आहे.

संशयास्पद मृत्यू

32 वर्षीय बालाजी रुद्रवार आणि 30 वर्षीय आरती रुद्रवार यांचा मृतदेह गेल्या बुधवारी न्यूजर्सीतील राहत्या अपार्टमेंटमध्ये चाकूने भोसकलेल्या अवस्थेत आढळला होता. बुधवारी सायंकाळी त्यांची चार वर्षीय मुलगी विहा गॅलरीत बराच वेळ एकटीच रडत बसल्याचे शेजाऱ्यांना दिसले. त्यामुळे संशय आल्याने त्यांनी या घटनेबद्दल पोलिसांना कळवले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आरती सात महिन्यांची गर्भवती

अंबेजोगाईतील प्रसिद्ध व्यापारी भारत रुद्रवार यांचा बालाजी हा मुलगा होता. आयटी कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने बालाजी सहा वर्षांपूर्वी अमेरिकेत न्यू जर्सीमधील अर्लिंग्टन भागात स्थायिक झाला होता. बालाजीची पत्नी आरती रुद्रावार सात महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती समोर आली आहे.

दहा दिवसानंतर मृतदेह भारतात

सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 8 ते 10 दिवसात दोघांचेही मृतदेह बीडला पोहोचणार आहेत. रुद्रवार यांची चार वर्षाची मुलगी रुद्रवार यांच्या न्यूजर्सीमधील मित्रांकडे आहे. माझी नात माझ्या मुलाच्या मित्राच्या घरी आहे. त्याचे अमेरिकेत अनेक भारतीय मित्र आहेत, असं बालाजी यांचे वडील भारत रुद्रवार यांनी सांगितलं. (balaji rudrawar murder case: no clue find after week)

संबंधित बातम्या:

अमेरिकेत असं काय घडलं की अंबाजोगाईच्या बालाजीनं बायकोला मरोस्तर भोसकलं? मग बालाजी कसा संपला? कोर्टात नवी माहिती उघड

अंबाजोगाईच्या ‘त्या’ कपलचं अमेरिकेत काय झालं?; नवऱ्यानेच बायकोला भोसकलं?, वाचा सविस्तर

अंबाजोगाईच्या तरुण दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, घरात मृतदेह आढळल्याने खळबळ

(balaji rudrawar murder case: no clue find after week)

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.