अमेरिकेत असं काय घडलं की अंबाजोगाईच्या बालाजीनं बायकोला मरोस्तर भोसकलं? मग बालाजी कसा संपला? कोर्टात नवी माहिती उघड

बीड येथील बालाजी रुद्रवार आणि आरती रुद्रवार या दाम्पत्याच्या मृत्यूबाबत न्यूजर्सीच्या न्यायालयात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. (US authorities probing tragic death of Indian couple in New Jersey)

अमेरिकेत असं काय घडलं की अंबाजोगाईच्या बालाजीनं बायकोला मरोस्तर भोसकलं? मग बालाजी कसा संपला? कोर्टात नवी माहिती उघड
balaji rudrawar
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 7:53 PM

न्यूजर्सी: बीड येथील बालाजी रुद्रवार आणि आरती रुद्रवार या दाम्पत्याच्या मृत्यूबाबत न्यूजर्सीच्या न्यायालयात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे या दाम्पत्याच्या मृत्यूचं गूढ अधिकच वाढलं आहे. विशेषत: बालाजी यांच्या मृत्यूबाबतचं गूढ अधिकच वाढलं आहे. (US authorities probing tragic death of Indian couple in New Jersey)

अमेरिकेतील लेटेस्ट ग्लोबल न्यूज या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं असून त्यात अनेक धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. बालाजी आणि आरती रुद्रवार बुधवारी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळले. त्यांच्या शेजारी त्यांचं मुलही होतं. मात्र, मुलीला कोणतीही दुखापत झालेली नाही, अशी माहिती बर्गन कौंटीचे वकील मार्क मुसेला यांनी सांगितलं. lत्यांनी याबाबतची माहिती कोर्टाला दिली आहे.

बालाजीला कोणी भोसकले?

दोघांच्याही अंगावर अनेक वार होते. बालाजीने भोसकल्याने आरतीचा मृत्यू झाल्याचं तपास यंत्रणेलाही वाटत आहे. आरतीप्रमाणेच बालाजीचाही भोसकून मृत्यू झाला आहे. त्याच्याही अंगावर अनेक वार करण्यात आले आहेत. परंतु त्यांचा मृत्यू कसा झाला? याबाबतचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांचा अटोपसी रिपोर्ट यायचा बाकी आहे. रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या मृत्यूमागचं कारण समजू शकेल, असं मुसेला यांनी सांगितलं. तर, या मृत्यू प्रकरणात अन्य कुणाचा हात असावा यावर आमचा विश्वास नाही, असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. बालाजीला कोणी भोसकले याचं गूढ अद्यापही कायम आहे. पोलीसही त्याचा शोध घेत आहेत. मात्र, त्यांना अद्याप त्याबाबतचा कोणताही क्ल्यू मिळालेला नाही.

गर्भवती होती की नाही माहीत नाही

7 एप्रिल रोजी बालाजीच्या शेजाऱ्याने 911 या नंबरवरून अर्लिंग्टन पोलिसांना संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी फोन केला होता. यावेळी त्यांनी शेजारच्या रुममध्ये दोन लोक निपचित पडलेले असून एक मुलगी रडत असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं, असं मुसेला यांनी सांगितलं. दुसरीकडे बालाजीचे वडील भारत रुद्रवार यांनी पीटीआयशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. आरती ही सात महिन्यांची गर्भवती होती, असं भारत यांनी सांगितलं होतं. आम्ही बालाजीला अमेरिकेत येऊन भेटलो होतो आणि पुन्हा अमेरिकेला जाण्याची आमची योजना होती, असं भारत यांनी सांगितलं होतं. मात्र, तपास यंत्रणांनी आरती गर्भवती होती की नाही हे सांगण्यास नकार दिला. त्यामुळे आणखीनच गूढ वाढलं आहे.

कुणी कुणावर हल्ला केला?

आरती आणि बालाजी या दोघांचंही भांडण झाल्याचं पोलिसांनी सूचित केलं आहे. परंतु, या भांडणात बालाजी आरतीने केलेल्या हल्ल्यात मारला गेला की स्वत: केलेल्या वॉरमधून हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आरती ही सात महिन्यांची प्रेग्नेंट होती. हे दोन्ही कुटुंब अत्यंत खूश होतं. बालाजींचे मित्र गोविंद सिंग निहलानी यांनी तर, a couple of few words but many smiles असं या जोडप्याचं वर्णन केलं आहे. यावरून हे दाम्पत्य आनंदी होतं, असं दिसून येतं. मग असं काय घडलं की ते दोघे एकमेकांच्या जीवावर उठले? हत्येपर्यंत भांडण टोकाला जाण्याचं कारण काय? असा सवाल पोलिसांना पडला आहे.

विहासाठी आर्थिक मदतीचं आवाहन

दरम्यान, बालाजी यांची कन्या विहाच्या भविष्यासाठी बालाजीच्या मित्रांनी निधी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. बालाजी आणि आरती यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांची साडेतीन वर्षाची मुलगी विहाच्या भविष्यासाठी आम्ही निधी गोळा करत आहोत. तुम्हाला शक्य तेवढी मदत करा. मदत छोटी आहे की मोठी हा प्रश्न नाही. मात्र तुमचा शेअर द्या. विहाचा ताबा तिच्या आजोबांना मिळावा म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. जमा केलेला निधी विहाच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणार असून आम्ही त्यासाठी एक ट्रस्ट तयार करणार आहोत, असं ऑनलाईन फंड जमा करणारे बालाजींचे मित्र गोविंद सिंग निहलानी यांनी म्हटलं आहे. गेल्या चोवीस तासात 70k डॉलर्स ( म्हणजे 52,31,415 रुपये) जमा केले आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. बालाजी हे लार्सन अँड टुब्रो या माहिती तंत्रज्ञान कंपनीत कामाला होते. ही कंपनी भारतीय आहे. या कंपनीला मेल केला आहे. परंतु त्यांनी तात्काळ प्रतिसाद दिला नाही, असं निहलानी यांनी सांगितलं. (US authorities probing tragic death of Indian couple in New Jersey)

संबंधित बातम्या:

अंबाजोगाईच्या ‘त्या’ कपलचं अमेरिकेत काय झालं?; नवऱ्यानेच बायकोला भोसकलं?, वाचा सविस्तर

अंबाजोगाईच्या तरुण दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, घरात मृतदेह आढळल्याने खळबळ

पाच वर्षांपूर्वी एकमेकांना शेवटपर्यंत साथ देण्याचं वचन, तरीही शुल्लक कारणावरुन पत्नीवर गोळी झाडली

(US authorities probing tragic death of Indian couple in New Jersey)

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.