AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशीर्वाद की… गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी; धाराशिवमध्ये दर्शनासाठी झुंबड

धाराशिव जिल्ह्यातील पाथरूड येथील गणपती मूर्तीच्या डोळ्यातून पाणी येत असल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. या घटनेमुळे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. हा दैवी चमत्कार मानला जात असला तरी, मूर्तीतून पाणी येण्यामागे ओलावा, आर्द्रता किंवा अन्य नैसर्गिक कारणे असू शकतात का, याचा वैज्ञानिक तपास होणे गरजेचे आहे.

आशीर्वाद की... गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी; धाराशिवमध्ये दर्शनासाठी झुंबड
ganpatiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 01, 2026 | 4:00 PM
Share

श्रीराम क्षीरसागर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, धाराशिव : सुमारे 39 वर्षापूर्वी गणपती दूध प्यायल्याची राज्यात चर्चा झाली होती. त्यावेळी प्रत्येकजण गणपतीला दूध पाजण्याचा प्रयत्न करत होता. हा दैवी चमत्कार असल्याचं म्हटलं जात होतं. नंतर त्याचे शास्त्रीय खुलासेही झाले. आता परत एकदा अशीच घटना घडली आहे. धाराशिवमध्ये एका गणपतीच्या मंदिरात चमत्कार घडावा अशी घटना घडली आहे. गणपतीच्या डोळ्यातून अक्षरश: पाणी टपकताना दिसत आहे. त्यामुळे अख्ख्या जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं आहे. जो तो धाराशिवला या गणपतीच्या दर्शनासाठी धाव घेताना दिसत आहे. मंदिरात गर्दी वाढत आहे. पण मूर्तीच्या डोळ्यातून पाणी येणं हे आशीर्वाद की आणखी काही संकेत, या विचाराने अनेकजण चिंताक्रांतही झाले आहेत. मात्र, ही घटना चमत्कार असल्याचा कुणीही दुजोरा दिलेला नाहीये.

धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरूड गावातील ऐतिहासिक गणपती मंदिरात आज एक वेगळाच प्रकार पाहायला मिळत आहे. मंदिरातील दगडी गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यांमधून गेल्या दोन तासांपासून पाणी येत असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. हा प्रकार पाहण्यासाठी मंदिरात ग्रामस्थ आणि भाविकांची गर्दी होत असून गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी येत असल्याचे दृश्य पाहून नागरिक चकित झाले आहेत.

एक सारखं पाणी टपकतंय

गणपतीच्या मूर्तीच्या एका डोळ्यातून सारखं पाणी टपकत आहे. डोळ्याला धार लागावी तसा एक एक थेंब सारखा टपकत आहे. विशेष म्हणजे मूर्तीला लेपन केल्यानंतरही मूर्तीच्या डोळ्यातून पाणी टपकत आहे. त्यामुळे मंदिरातील पुजारीपासून सर्वांनाच धक्का बसला आहे. अचानक झालेल्या या प्रकाराने सर्व भांबावले आहेत. या मागे काही वेगळं कारण तर नाही ना? अशी भीती मनात येत आहे. तर गावागावात या चमत्काराची माहिती पोहोचल्याने लोकांनी मंदिराची वाट धरली आहे.

दरम्यान, हा प्रकार नेमका कशामुळे घडला, मूर्तीच्या दगडामध्ये ओलावा निर्माण झाला आहे का? मंदिरातील वातावरणातील आर्द्रता किंवा अन्य कोणते नैसर्गिक कारण यामागे आहे का? याची शास्त्रीय तपासणी होणे गरजेचे आहे. नेमकं गणेश उत्सवाच्या तोंडावर हा प्रकार समोर आल्याने ग्रामस्थांकडून हा प्रकार चमत्कार मानला जात आहे. मात्र त्यामागील नेमके कारण तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा