महाविकास आघाडीच्या सभेपूर्वी इम्तियाज जलील यांची रोखठोक भूमिका, राड्याच्या मुद्द्यावरुन…..

| Updated on: Apr 02, 2023 | 4:47 PM

छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण तापलेलं बघायला मिळत आहे. महाविकास आघाडीची आज संभाजीनगरमध्ये वज्रमुठ सभा आयोजित करण्यात आलीय. तर भाजप आणि शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात आलीय. या घडामोडींवर खासदार इम्तियाज जलील यांनी आपली परखड भूमिका मांडलीय.

महाविकास आघाडीच्या सभेपूर्वी इम्तियाज जलील यांची रोखठोक भूमिका, राड्याच्या मुद्द्यावरुन.....
Follow us on

मुंबई : छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी संभाजीनगरमधील सध्याच्या घडामोडींवर अतिशय परखड शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. “सर्व राजकीय पक्षांना सभा घेण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीने सभेसाठी पोलिसांची परवानगी घेतली होती. याय दरम्यान तीन दिवसांपूर्वी माझ्या शहरात जे घडलं त्या पार्श्वभूमीवर मला लोकांनी विचारलं की, मविआची सभा पुढे ढकलण्याची आवश्यकता आहे का? तर मी नाही असं उत्तर दिलं. कारण लोकांमध्ये हा संदेश जायला हवा की, आता सगळं ठीक झालेलं आहे. पण एक अट अशी होती की, माझी विनंती आहे, महाविकास आघीच्या नेत्यांनी सभेतून प्रक्षोभक भाषण करु नका, ज्यामुळे शहराची शांतता भंग होईल. मी महाविकास आघाडीच्या सभेचं स्वागत करतो”, अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली.

“मी एकटा आहे की, एक मागणी करतोय. एका निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा. जेव्हा मी हायकोर्टाच्या रिटायर्ड जजच्या माध्यमातून चौकशीची मागणी केली तेव्हा त्यांचे देखील धाबे दणाणले आहेत. त्यांना असं वाटत होतं की, आपण महाराष्ट्र सरकारच्या एखाद्या अधिकाऱ्याकडून दबाव आणून करुन घेऊ. माझी एक विनंती आहे, हे सगळे लोक एकमेकांवर बोट दाखवत आहेत. मंदिरामध्ये इम्तियात कशाला गेले होते? तुम्ही चौकशीचा तातडीने निर्णय द्या. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा”, असं इम्तियाज जलील म्हणाले.

‘…तेव्हा फक्त 15 पोलीस राम मंदिरात होते’

“माझ्या भूमिकेपेक्षा पोलिसांची या शहराविषयी जी संशयास्पद भूमिका झालेली आहे ती खूप गंभीर बाब आहे. रामनवमीच्या दिवशी दंगल घडत होती तेव्हा फक्त 15 पोलीस राम मंदिरात होते. त्यांची जबाबदारी राम मंदिराची सुरक्षा करायची आणि समाजकंटकांपासून परिस्थिती हातळण्याची जबाबदारी होती. तुम्ही मला उत्तर द्या तेव्हा शहरातील पोलीस कुठे होती? 100 कोटी रुपयांच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तुम्ही शहराला सीसीटीव्ही लावण्याचं म्हटलं आहे. कुठेत सीसीटीव्ही ते दाखवा”, असं आव्हान जलील यांनी दिलं.

“तीन तास जे करायचं ते करा. तुम्हा दगडफेक करायची करा, जाळपोळ करायची तर करा, तुम्हाला मंदिरमध्ये शिरता आलं तर मंदिरात जे कारयचं ते करा, त्याचं उत्तर हे सरकार का देत नाही? तुम्ही माझ्या शहराला काय समजत आहात? कुठेही या, जे करायचं आहे ते करा, याचं उत्तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे देत नाहीत”, अशा शब्दांत जलील यांनी निशाणा साधला.

“पोलिसांनी आज महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी दिली होती. मग पोलिसांनी कोणत्या आधारावर भाजपला सावरकर गौरव यात्रा काढण्याची परवानगी दिली? तुमचा उद्देश काय आहे? दबाव कुणावर आहे? देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना सांगितलं होतं का, की मरु द्या जेवढे लोकं मरतील तेवढे. काय व्हायचं ते होऊ द्या. पण आमच्या लोकांना घाणेरडं राजकारण करण्याची परवानगी द्या. सावरकरांची आज पुण्यातिथी आहे की जयंती आहे?”, असा सवाल त्यांनी केलाय

“पोलिसांना पत्रकार परिषद घ्यायला सांगा आणि परिस्थिती कशी होती, पोलीस किती होती ते सांगा. चित्रपटासारखं तीन तासात तिथे घडामोडी घडतात. त्यानंतर सगळ्या पोलिसांच्या गाड्या येतात”, असा दावा इम्तियाज जलील यांनी केला.